💥शेतकऱ्यांनी नेहमीच देशहिताचा विचार केलेला आहे मात्र त्यांचा विचार कोणीच करत नाही ही वस्तुस्थिती आहे💥
आजही शेतकरी राजा खूप अभिमानाने सांगतो आहे की देश संकटात असताना माणुसकीला प्रथम प्राधान्यक्रम देऊन शेतकऱ्यांनी कधीच संधीचा फायदा ऊठऊन भाजीपाला, दुध, धान्य या वस्तूंचा काळाबाजार केला नाही. उलट लॉकडाऊनच्या भीतीने तो 30 रु. किलोचा भाजीपाला 15 रु. किलोने देण्यास तयार होतो. शेतकऱ्यांनी नेहमीच देशहिताचा विचार केलेला आहे मात्र त्याचा विचार कोणीच करत नाही ही वस्तुस्थिती आहे.
शेतमाल सोडता इतर कुठलीही वस्तु लॉकडाऊनच्या काळात खरेदी करण्यासाठी जाऊन बघा त्यांची अनेक कारणे असतात, लॉकडाऊन आहे, माल भेटत नाही,वाहतूक बंद आहे, भाव वाढलेले आहेत, थोडाच माल शिल्लक आहे,दुकान फक्त थोडया वेळ चालु आहे.अशा ठिकाणी गरजू व्यक्तीला लूटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लॉकडाऊन आहे. त्याच ठिकाणी शहरात आपला शेतकरी भाजीपाला विकायला गेला तर व्यापारी लोक कारणं सांगतात लॉकडाउन आहे.अमुक मार्केट बंद आहे, गिर्हाईक कमी आहे त्यामुळे भाव नाही. त्या ठिकाणी शेतकरी पोटच्या पोराप्रमाणे पिकवलेला शेतमाल कवडीमोल भावात विकतो आहे ही खेदाची गोष्ट आहे. यावर कुणाचाही अंकुश नाही. शेतकरी आपला नाशवंत माल असून विचार करत नाही मात्र टिकाऊ वस्तू ते पण जास्त भावाने विकणारेच पोटपाण्यासाठी जास्त ओरडत आहेत.एकीकडे कोरोना संकट दुसरीकडे महागाई खुप वाढलेली आहे.शेतमाल व इतर वस्तूंच्या बाजारभावाच्या तुलनेत खुप विषमता आहे.आपल्या वस्तूंची विक्री किंमत घटू नये म्हणून सर्व कंपन्यांनी त्या वस्तूंचे वजन आकारमान दिवसेंदिवस कमी करत चालले आहेत त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतमालाचा 100 किलोचा क्विंटल 80 किलोचा करायला काय हरकत आहे? सरकार व जबाबदार घटकांनी या गोष्टींचा विचार करून सद्या लॉकडाउनच्या नावाखाली साठेबाजी करणारे व वाढीव किंमतिला वस्तू विकणार्यांना चाप लावला पाहिजे.लॉकडाउनच्या काळात ज्या बळीराजाने आपली अर्थव्यवस्था सांभाळली त्याला तुम्ही संकटाच्या वेळी संभाळू का शकत नाही? एक दिवस स्वतःच्या पोटाला लॉकडाऊन करा मगच सरकार व व्यवस्थेला शेतकऱ्यांच महत्व कळेल. असो संकट खुप गंभीर आहे, मात्र लुटणारे देखील खुप खंबीर आहेत...
✍️रघुनाथ भोसले पाटील
मराठवाडा अध्यक्ष,अ.भा.क्रांतीसेना.
0 टिप्पण्या