💥पुणे शहरातील कारवाईमुळे गुंडांचे धाबे दणाणले १७५ गुन्हेगारांवर कारवाई; २० गुंड टोळ्यांना ‘मोक्का’...!


💥पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुंड टोळ्यांना चाप लावण्यासाठी मोक्का कारवाईचा प्रभावी वापर केला सुरू💥

पुणे : शहरातील गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात येत आहे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुंड टोळ्यांना चाप लावण्यासाठी मोक्का कारवाईचा प्रभावी वापर सुरू केला असून गेल्या तीन महिन्यात शहरातील २० गुंड टोळ्यांवर मोक्का कारवाई  करण्यात आली आहे मोक्का कारवाईमुळे गुंड टोळ्यांचे धाबे दणाणले आहे. 

गुंडगिरीचे उच्चाटन करण्यासाठी पोलीस आयुक्त गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी गुंड टोळ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत गुप्ता यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शहरातील सर्व प्रमुख गुंड टोळ्यांचे म्होरके, साथीदारांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे सामान्यांना त्रास देणाऱ्या गुंडांविरोधात झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (एम.पी.डी.ए.) कारवाई करून त्यांना कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. 

मार्च महिन्यात १० गुंड टोळ्यांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे दहा टोळ्यांमधील ८९ गुंडांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे यंदाच्या वर्षी गेल्या तीन महिन्यात २०  गुंड टोळ्यांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे तळोजा कारागृहातून बाहेर पडणाऱ्या महागडय़ा मोटारींच्या ताफ्यातून मिरवणूक काढणाऱ्या कोथरूडमधील गुंड गजानन मारणे टोळीविरोधातही कारवाई करण्यात आली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या