💥मुस्लिमांच्या लग्न समारंभात डि.जे. वाजवल्यास निकाहनाम्याचे पठण केलं जाणार नाही...!


💥मरकजी सुन्नी जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष असणाऱ्या मौलाना नजम अली खान यांनी काढल फर्मान💥

उत्तर प्रदेशमधील मिर्झापूरमधील मरकजी सुन्नी जमीयत उलेमा-ए-हिंदने मदरसा अरबिया म्हणजेच मदरश्यांच्या प्रमुखांच्या बैठकीनंतर एक महत्वाचा फर्मान जारी केला आहे या बैठकीदरम्यान सर्व मदरश्यांच्या प्रमुखांशी चर्चा करुन मुस्लिमांच्या लग्नात डी.जे. वाचवला जाऊ नये असा निर्णय घेण्यात आला आहे ज्या ठिकाणी लग्नामध्ये डी.जे. वाजवण्यात येतील किंवा निकाह ठरवण्यासाठी काझी गेले असता तिथे डि.जे.ची व्यवस्था असेल तर काझी निकाहनामा वाचणार नाहीत असं सांगण्यात आलं आहे. 

एवढचं नाही तर डी.जे.ची व्यवस्था असतानाही एखाद्या काझीने निकाहनामा वाचला तर त्याला समाजातून बहिष्कृत करण्यात येईल असंही बैठकीनंतर घोषित करण्यात आलेल्या निर्णयामध्ये म्हटलं आहे मरकजी सुन्नी जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष असणाऱ्या मौलाना नजम अली खान यांनी मुस्लीम समाजातील लग्नांसंदर्भातील काही नियम ठरवण्यात आल्याची माहिती न्यूज १८ शी बोलताना दिली हुंडा मागणे, कार्यक्रमामध्ये उभं राहून जेवणं, डी.जे. वाजवणं तसेच लग्नामध्ये फटक्यांची आतिशबाजी करणाऱ्यांविरोधात निकाह लावणाऱ्या धर्मगुरुंनीच मोहीम सुरु केली असून याची सुरुवात मिर्झापूरपासून केली जात असल्याची माहिती मौलाना नजम अली खान यांनी दिली. 

कमिटीने दिलेल्या माहितीनुसार आधी लोकांना शरीयतच्या नियमांनुसार निकाह करण्यासंदर्भात सांगण्यात येईल मात्र त्यानंतरही त्यांनी नकार दिल्यास कोणतेच काझी निकाहनामा वाचणार नाहीत जर एखाद्या ठिकाणी काझींना या व्यवस्थांसाठी सोय केल्याचं दिसलं तर ते निकाह न लावताच तिथू निघून जातील असं सांगण्यात आलं आहे. जर एखाद्या काझीने नियमांचे उल्लंघन करुन निकाह लावून दिला तर त्याला मुस्लीम समाजातून बहिष्कृत करण्यात येईल...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या