💥घरात बसूनच नमाज पठणाचे केले आवाहन💥
ताडकळस (दि.मे २०२१) - पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर उपसरपंच शेख यांनी समस्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या व कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घरात बसूनच नमाज पठण करावे असे आवाहन केले. धर्म परंपरेप्रमाणे मुस्लिम बांधव सार्वजनिक नमाज पठण करतात परंतु यावर्षी कोविड-19 चे मोठे संकट जगावर कोसळले आहे राज्य शासनाने आणि जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण संचारबंदी घोषित करण्यात आलेली आहे सर्व धर्मीयांची मंदिर,मस्जिद व इतर प्रार्थना स्थळे बंद करण्यात आलेली आहेत त्यामुळे मुस्लिम बांधवांनी ही संचारबंदी व जमावबंदीच्या नियमांचे पालन करून सार्वजनिक प्रार्थना स्थळावर गर्दी न करता 'रमजान'चा नमाज पठण घरीच करावा.
केंद्र व व राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे व कोरोना विरोधाच्या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहनही उपसरपंच शेख यांनी केले आहे तसेच देशावरील व राज्यावरील कोरोना चे संकट निवारण्याची आपण सर्व मिळून अल्ला जवळ प्रार्थना करूया घरी बसून आपल्या कुटुंबीयांसोबत पवित्र रमजान साजरा करूया अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या उपसरपंच शेख गेल्या अनेक वर्षापासून पवित्र रमजान ईदच्या शुभेच्छा मुस्लिम बांधवांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देतात परंतु यावर्षीची ईद कोरोना च्या सावटाखाली होत असल्यामुळे सोशल डिस्टन्स सिंग व इतर बंधने आली आहेत त्यामुळे प्रत्यक्ष भेट शक्य नसली तरी आपल्या शुभेच्छा मुस्लिम बांधवांच्या सोबत आहेत असा शुभेच्छा संदेश त्यांनी दिला आहे...
0 टिप्पण्या