पुर्णा (दि.१४ मे २०२१) - जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती आज शुक्रवार दि.१४ मे २०२१ रोजी सकाळच्या सुमारास पुर्णा पोलिस स्थानकात प्रभारी अधिकारी सपोनि.दिनेश मुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली.
जगतज्योती महात्मा बसवेश्वरांनी समस्त मानव समाजासाच्या कल्याणासाठी दानधर्मापेक्षा दासोह महत्त्वाचा आहे. शिक्षण घ्या,वचने लिहा, वाचनसाहित्य वाचा. ज्ञानी व्हा, नैतिक बना, विवेकी बना, स्वतःमध्ये बदल करा. स्वतामधील दोष दूर करा. कर्मकांड दूर करा. स्वतःची स्तुती करू नका अशी सहज साधी सोपी वाटणारी पण माणसाला घडवणारी बहुमोलाची शिकवण दिली असल्याने समता बंधुभाव जोपासत प्रत्येक नागरिकाने त्यांच्या विचारांची प्रेरणा घेण्याची आज खऱ्या अर्थाने आवश्यकता असल्याचे मत यावेळी सपोनि.मुळे यांनी व्यक्त केले.
पुर्णा पोलिस स्थानकाचे सपोनि.दिनेश मुळे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी ठाण्यात बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली यावेळी पोलिस उपनिरिक्षक,पोलिस हवालदारआदींसह अनेक कर्मचारी उपस्थित होते यावेळी सपोनि.मुळे यांनी रमजान ईद निमित्त मुस्लीम बांधवांना तर अक्षय तृतीया निमित्त हिंदु बांधवांनाही पोलिस प्रशासनाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा दिल्या ....
0 टिप्पण्या