💥पक्ष संघटन मजबुतीसाठी काम करून पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करील असे प्रशांत डोंगरदिवे यांनी सांगीतले💥
✍️ मोहन चौकेकर
चिखली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बुलढाणा जिल्ह्याचे सर्वेसर्वा अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री बुलढाणा जिल्हा मा. ना.डाॅ.राजेंद्र शिंगणे यांच्या आदेशानुसार तसेच जिल्हा अध्यक्ष एड.नाझेर काझी यांच्या आदेशाने चिखली विधानसभा अध्यक्ष शंतनु पाटील यांनी चिखली येथील धडाधडीचे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत डोंगरदिवे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिखली विधानसभा सरचिटणीस पदी नुकतीच निवड केली आहे. प्रशांत डोंगरदिवे हे सतत गोर गरीबांचे प्रश्न शासन दरबारी निवेदन व विविध आंदोलनाच्या माध्यमातुन मांडत आल्याने चिखली विधानसभा क्षेत्रात त्यांचे नाव लौकीक आहे
मागील काही महिन्यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश करुन पक्ष संघटनसाठी मोलाचे कार्यसुध्दा केले आहे. त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणुन त्यांना आज दिनांक १९ मे रोजी प्रदेश प्रतिनीधी शंतनु बोंद्रे, विधानसभा क्षेत्राध्यक्ष शंतनू पाटील, तालुका अध्यक्ष गजानन वायाळ, शहराध्यक्ष रवींद्र तोडकर, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेखर बोंद्रे यांच्या हस्ते चिखली विधानसभा सरचिटणीसपदी नियुक्ती देण्यात आली. तसेच पक्ष संघटन मजबुतीसाठी काम करून पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करील असे प्रशांत डोंगरदिवे यांनी सांगीतले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी शंतनू भारत बोंद्रे, विधानसभा अध्यक्ष शंतनू पाटील, तालुकाध्यक्ष गजानन वायाळ, शहराध्यक्ष रवींद्र तोडकर, युवक जिल्हाध्यक्ष शेखर बोंद्रे, ओबीसी सेलचे अध्यक्ष सुभाष देव्हडे, पालकमंत्री यांचे स्वीय सहाय्यक संतोष लोखंडे, शहर उपाध्यक्ष निमराव देशमुख, प्रमोद पाटील सेवादल अध्यक्ष माजी, प्रमोद चिंचोले, सदानंद मोरगंजे, जिल्हा सरचिटणीस भगवानराव काळे, दिपकराव मस्के, राम खेडेकर, डाॅ प्रकाश शिंगणे, प्रशांत एकडे, बाळासाहेब पवार, डॉ विकास मिसाळ, सतीश बाहेकर, प्रफुल्ल भुतेकर, प्रवीण घड्याळे, प्रशांत झिने, राजेश गवई, गणपतराव गायकवाड, रामेश्वर उबाळे, रहीम पठाण, विजय अंभोरे, अनिल कणखर, अनिल वाघ, दीपक काळे, नंदु अंभोरे, प्रविण लहाने यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थीत होते......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या