💥तालुक्यातील कान्हेगावातील नदीपात्रातून चोरट्या वाळूची वाहतूक करणारा टिप्पर आज पुन्हा घेतला पोलिसांनी ताब्यात💥
पुर्णा (दि.२१ मे २०२१) - तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नदीपात्राव सातत्याने खुलेआम रेती तस्करांकडून दरोडे घालण्यात येत असतांना स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायत सरपंच,ग्रामसेवक,पोलिस पाटील,मंडळ अधिकारी (कोतवाल) तलाठी या दक्षता समितीतील जवाबदार मंडळी मात्र नदीपात्रातील शासकीय गौण-खनिज रेतीचे राजरोसपणे मोठ्या प्रमाणात होणारे उत्खनन व चोरी रोखण्याऐवजी या गौण खनिज रेती चोरीला मुकसंमती देऊन तस्करांसह स्वतःचेही उकळ पांढरे करून घेत असल्यामुळे पुर्णा-गोदावरी नदीपात्रांवर अक्षरशः रेती तस्कर दरोडेखोरांनी धुमाकूळ घातल्याचे निदर्शनास येत असून काल गुरुवार दि.२० मे २०२१ रोजी तालुक्यातील कान्हेगाव शिवारातील पुर्णा नदीपात्रातून अवैध चोरट्या रेतीची चोरी करतांना पुर्णा पोलिस प्रशासनाने ट्रॅक्टर जप्त केल्याच्या घटनेला अवघे चोवीस तासही उलटत नाही तोच आज शुक्रवार दि.२१ मे २०२१ रोजी सकाळी ७-०० वाजेच्या सुमारास त्याच कान्हेगाव शिवारातील पूर्णा नदी पात्रातून सपोनि.दिनेश मुळे सहकारी पोलिस कर्मचारी पोलिस हवालदार.टाक,सावंत,पोना.मल्हारी पवार,चालक गजबार,होमगार्ड वाघमारे यांच्या पथकाकडून रेतीची चोरटी वाहतूक करणारा टिप्पर पकडण्यात आला असून आरोपी चालक/मालक यांचे विरोधात पुर्णा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनी गुट्टे हे करत आहेत....
0 टिप्पण्या