💥कोरोना नियमांचे पालन नकरता विनामास्क फिरणाऱ्यांसह आस्थापणा उघड्या ठेवणाऱ्यांना आकारला दंड💥
पुर्णा (दि.१७ मे २०२१) - कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता शासनाने लॉकडाऊन संचारबंदीसह कलम १४४ अंतर्गत जमावबंदी आदेश लागू केलेले असतांनाही व जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी दिपक मुगळीकर यांनी जिल्ह्यात सर्वत्र कोरोना नियमावली लागू केल्यानंतरही काही महाभाग पुर्णा तालुक्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत असल्याने निदर्शनास येत असल्याने पुर्णा पोलिस स्थानकाचे प्रभारी अधिकारी कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलिस निरिक्षक दिनेश मुळे यांनी प्रशासकीय निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोध धडक मोहीम राबवली असून आज सोमवार दि.१७ मे २०२१ रोजी सपोनि.मुळे यांच्या निर्देशाखाली पोलिस पथकाने शहरात विनामास्क फिरणाऱ्या २२ जनांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून २२००/- रुपये दंड वसून केला तर आस्थापणा उघडून व्यवहार करणाऱ्या तिन व्यापाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून १२००/- दंड वसूल केला अश्या एकंदर २५ जनांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करून एकून ३४००/- दंड आकारण्यात आला तर प्रशासकीय निर्देशांचे उल्लंघन करून आपल्या आस्थापणा उघड्या ठेवून व्यवहार करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांच्या विरोधात कलम १८८ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले तर १० मोटारसायकल ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली व १५२ जनांची आटी-पिसीआर चाचणी करण्यात आली असून पोलिस प्रशासनाने राबवलेल्या या धडक मोहीमे मुळे प्रशासकीय निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या चांगलीच पाचावर धारण बसल्याचे आज निदर्शनास आले...
0 टिप्पण्या