💥या रक्तदान शिबिरास परिसरातून प्रतिसाद ; ४० रक्तदात्यांनी केले रक्तदान💥
रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते.राज्यात विविध रुग्णालयांमध्ये आज मोठ्या प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने कन्हैया बाहेती यांनी सामाजिक भान जपत ,१४ मे रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती व महात्मा बसवेश्वर जयंती तसेच भगवान परशुराम जयंती निमित्त शिवसेना युवासेना संपर्क प्रमुख आनंदजी जाधव साहेब ,युवासेना विस्तारक अभिषेकजी शिर्के साहेब, हिंगोली जिल्हा प्रमुख तथा आमदार कळमनुरी संतोषदादा बांगर, खासदार हेमंत भाऊ पाटील, मा. आमदार जयप्रकाश मुंदडा साहेब, युवासेना जिल्हा प्रमुख बाजीराव दादा सवंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठक्कर कॉम्प्लेक्स वसमत येथे शिवसेना युवासेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे घेण्यात आले त्यावेळी नगराध्यक्ष श्रीनिवास पोरजवार तालुकाप्रमुख राजू चापके उपतालुका प्रमुख विलास नरवाडे शिव सेना शहर प्रमुख काशिनाथ भोसले युवा सेना तालुका प्रमुख संदीप कातोरे युवा शहर प्रमुख धीरज कुलथे सागर चेपुरवार माणिक वारे संभाजी डाखोरे ऋषी कोरडे श्याम कोरडे सुरज सरोदे शुभम भोपाळे प्रसाद गोजेवर मनीष कापसे बापूराव साडे आशिष सोनी कृष्णा भोसले कपिल नवघरे माजी तालुकाप्रमुख अनिल कदम व इतर या शिबिरास परिसरातून भरपुर प्रतिसाद देऊन ४० रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केले.ह्या कोरोना काळात आपण केलेल्या रक्तदानामुळे कोणाचा तरी जीव वाचेल ह्या भावनेने आपण सर्व जण मिळून जास्तीतजास्त रक्तदान करू आणि संकटात सापडलेल्या लोकांना मदत करू. हिच आदरांजली आपण जयंती निमित्त त्यांच्या चरणी वाहू. असे विनम्र आवाहन वसमत येथील सामाजिक कार्यकर्ता कन्हैया बाहेती यांनी केले होते.
कन्हैया बाहेती यांचं नेहमीच सामाजिक कार्यात मोलाचं योगदान राहिलेलं आहे.फक्त समाजसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून महापुरुषांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न झाले....
0 टिप्पण्या