💥जिल्ह्यात आज उपचारा दरम्यान १२ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू 💥
परभणी (दि.१९ मे २०२१) - परभणी जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनासह पोलिस प्रशासनाच्या संतर्कतेमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या आता हळुहळू कमी होतांना दिसत असून आरोग्य प्रशासनातील आरोग्य तज्ञांकडून होणारा यशस्वी औषधोपचार तसेच जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाकडून लॉकडाऊन संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी होत असल्याने वाढत्या कोरोना संसर्गाला बऱ्याच प्रमाणात लगाम लागला असून जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही सातत्याने वाढतांना दिसत आहेत आज बुधवार दि.१९ मे २०२१ रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधोपचार घेऊन पुर्णपणे बरे झालेल्या ४३६ रुग्णांना रुग्णालय प्रशासनाने सुट्टी दिली असून जिल्ह्यात आज बुधवारी रुग्णालयात उपचारा दरम्यान १२ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला तर जिल्ह्यात आज बुधवारी नव्याने ३६१ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून सद्या शासकीय रुग्णालयात २६६६ कोरोनाबाधीत रुग्ण उपचार घेत असल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने एका प्रेसनोट द्वारे कळवले आहे...
0 टिप्पण्या