💥विदर्भ विभागीय अध्यक्ष श्री आनंद कुमार शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष सौ वर्षाताई राज इंगळे यांनी निवड💥
✍️ मोहन चौकेकर
चिखली:- येथिल साहित्यिक लेखक ,कवी तसेच सामाजिक क्षेत्रात सदा अग्रेसर राहणारे हि .रा .गवई सर यांची जिल्हा प्रमुख सल्लागार पदी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री शरद गोरे व विदर्भ विभागीय अध्यक्ष श्री आनंद कुमार शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष सौ वर्षाताई राज इंगळे यांनी निवड केली आहे .या निवडीमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहेत तसेच साहित्य क्षेत्रात तील सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. जेष्ठ साहीत्यीक प्रा. आनंद साबळे सर, कवी गायक मिलिंद भंडारे, सर भारतीय मानवाधिकार संघटन चे जिल्हाध्यक्ष प्रशांतभैया डोंगरदिवे, श्री शिवाजी हायस्कुल ईसोलीचे मुख्याध्यापक एन. एस. गायकवाड, एस. एस.सपकाळ, जी. बी. मेरतकर व न. प. प्रकल्प अधिकारी सुभाष पाखरे यांनी छोटेखानी कार्यक्रमात हि.रा.गवई यांचा सत्कार घेऊन सन्मानित केले. सर सामाजिक बांधिलकी जोपासत शिक्षकी पेशात राहून सुद्धा बहुजन समाजातील महापुरुषांच्या विचारधारेला अनुसरून लेख कविता व साहित्य करीत असतांना त्यांनी क्रांतीफुले कवीतासंग्रह सुध्दा प्रकाशित केला आहे . फुले शाहू आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यासाठी, मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी हि.रा.गवई साहित्याच्या माध्यमातून कार्य करतील असा विश्वास अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या वरिष्ठांनी या निवडीतून व्यक्त केला आहे. अलीकडेच हि. रा. गवई यांचा क्रांती फुले हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून तो साहित्य क्षेत्रात चांगलाच नावजला होता....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या