💥वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी संगनमेर इथे अखेरचा श्वास घेतला💥
तमाशाच्या रंगभूमीवर शिवाजी संभाजी या पुरुषी भूमिका रंगवणाऱ्या अस्सल लोककलावंत कांताबाई सातारकर यांचं निधन झालंय वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी संगनमेर इथे अखेरचा श्वास घेतला ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या त्या आई आहेत काही दिवसांपूर्वीच त्या करोना पॉझिटिव्ह आल्या होत्या ज्येष्ठ लोककलावंत कांताबाईं सातारकर यांच्या तमाशाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे संपूर्ण कुटुंब आजही एकत्र राहून तमाशा रंगभूमीची सेवा करीत आहे.
त्यांचे चिरंजीव कलाभूषण रघुवीर खेडकर, मुली अनिता, अलका, मंदाराणी, नातू मोहित व अभिजित, नातसून अमृता, नात पूजा, जावई दीपकराव मेंगजी, गोतान्बर सौन्दाडेकर, राजेश खोल्लम असा संपूर्ण परिवार तमाशा रंगभूमीवर कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वीच रघुवीर खेडकर यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य पॉझिटिव्ह होते त्यातील काही जण करोनातून बाहेर पडून त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला होता.
कांताबाई सातारकर यांच्यावर मागील काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते दरम्यान उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पार्थिवावर अंतिमसंस्कार करण्यात येणार असल्याचं समजतंय त्यांच्या निधनानंतर लोककलेची मोठी परंपरा पुढे घेऊन जाणारी एक बहुआयामी चेहरा हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे सन २००५ मध्ये महाराष्ट्र शासनाने तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा पहिला विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान केला आहे दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सदर करण्याचा बहुमान मिळाला आहे....
0 टिप्पण्या