💥लसीकरण कार्यक्रम जनेसीस औद्योगिक वसाहतीमधील इबको प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सुरू केला आहे💥
आपल्या उद्योगातील उत्पादन निरंतर सुरू राहावे तसेच आपल्या कामगारांचे व त्याच्या कुटुंबीयांचे स्वास्थ अबाधित राहावे या दृष्टीने जिल्ह्यातील काही मोठ्या उद्योग समूहांनी आपल्या कामगारांसाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी खासगी लसीकरण मोहीम हाती घेतली आहे पालघर जिल्ह्यातील अशा उद्योग समूहातील लसीकरण कार्यक्रम जनेसीस औद्योगिक वसाहतीमधील इबको प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सुरू केला आहे.
या उद्योग समूहातील तीन कारखान्यातील कामगार, त्यांचे कुटुंबीय, कंपनीला सेवा देणारे वाहक तसेच कच्चा माल पुरवठा करणाऱ्या विक्रेत्यांना या विशेष मोहिमे अंतर्गत लसीकरण कंपनी तर्फे करण्यात येणार आहे मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयाच्या मदतीने कंपनीच्या आवारामध्ये विशेष लसीकरण व्यवस्था आजपासून सुरू करण्यात आली असून सुमारे २ हजाराहून अधिक लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्यात कोविशील्ड लस देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील अशा प्रकारचे लसीकरण सुरू करणारे हे पहिले उद्योग समुदाय असून रिलायन्स इंडस्ट्रीज व टाटा समूहातर्फे आगामी काळात आपल्या कामगारांसाठी विशेष खासगी मोहिमेअंतर्गत लसीकरण करण्याच्या दृष्टीने परवानगी घेण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे....
0 टिप्पण्या