💥महापालिकेनं १ कोटी कोरोना प्रतिबंधक लशींची जागतिक निविदा काढली होती💥
मुंबईत करोना लसीकरणाचा वेग गेल्या काही दिवसात मंदावला आहे पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध नसल्याने मुंबईत काही ठिकाणी लसीकरण केंद्र बंद करण्यात आली आहेत लसीकरणाचा तुटवडा पाहता मुंबई महापालिकेनं १ कोटी लशींची जागतिक निविदा काढली होती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परवानगीनंतर ही निविदा काढण्यात आली होती मात्र निविदा काढल्यानंतर कुणीच रुची न दाखवल्याने कालावधी वाढवण्यात आला होता आता मुंबईत करोना लशींचा पुरवठा करण्यासाठी रशियाची वैज्ञानिक संस्था असलेल्या आर.डी.आय.एफ.कडून प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे एनडीटीव्ही इंडियानं याबाबतच वृत्त दिलं आहे.
मुंबई महानगरपालिकेनं ११ मे रोजी निविदा काढली होती निविदेची तारीख २५ मे रोजी संपणार आहे मात्र तत्पूर्वी तीन प्रस्ताव आले आहेत यापैकी एक प्रस्ताव थेट रशियन डायरेक्टर इनव्हेस्टमेंट फंडकडून आला आहे तर दोन प्रस्ताव इतर खासगी कंपन्यांकडून आले आहेत तिन्ही कंपन्यांनी रशियाच्या स्टुटनिक व्ही लसीचा पुरवठा करण्याची तयारी दाखवली आहे रशियातील स्पुटनिक व्ही लशीला देशात परवानगी मिळाली आहे त्यानंतर लसीकरणही सुरु झालं आहे मुंबई महापालिका लस खरेदीवर ३०० ते ७०० कोटी रुपये खर्च करणार आहे.
मुंबई महानगरपालिकेचं ६० ते ९० दिवसांच्या आता लसीकरण करण्याचं लक्ष्य आहे दुसरीकडे पंजाब आणि दिल्ली सरकारने काढलेल्या निविदेला खासगी कंपन्यांनी पाठ दाखवली आहे रशियामधून पहिला साठा हा १ मे रोजी भरतात दाखल झाला स्थानिक औषध प्रशासनाने त्याला १३ मे रोजी मान्यता दिली....
0 टिप्पण्या