💥परभणी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान ह्रदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ८० व्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले💥
पूर्णा (दि.१२ मे २०२१) - भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष व पंचायत समितीचे माजी अधीक्षक आरबी सोनुले यांचे परभणी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने उपचारादरम्यान वयाच्या ऐंशीव्या वर्षी दुःखद निधन झाले . सेवानिवृत्तीनंतर त्यांनी स्वतःला सामाजिक व धार्मिक कामांमध्ये वाहून घेतले होते. पूर्णा येथील सार्वजनिक भीम बुद्धजयंती मंडळाचे अध्यक्ष या नात्याने त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिलेली आहे. जयंती मंडळाच्या शिल्लक राहिलेल्या रकमे मधून त्यांनी अतिशय भव्य दिव्य बुद्ध मूर्तीची खरेदी केली व बुद्ध विहारला दान दिली.
भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द अतिशय चांगली राहिली.गाव तिथे भारतीय बौद्ध महासभेची शाखा स्थापन करून धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. श्रीलंका थायलंड भूतान या बौद्ध देशांना भेट देऊन तेथील धम्म संस्कृती जाणून घेतली नोकरी मध्ये असताना अनेक होतकरू विद्यार्थ्यांना व तरुणांना शिक्षणा मध्ये त्यांनी मदत केली त्यांच्या पश्चात दोन मुले भूषण व एस कुमार व कन्या आम्रपाली आहेत भूषण हे एका बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये उच्च पदावर आहेत. एस कुमार हे जिल्हा मध्यवर्ती बँकेत वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत संस्कृती महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ.केशव जोंधळे यांचे ते सासरे होत.
परभणी याठिकाणी अतिशय शोकाकुल वातावरणामध्ये रात्री दहा वाजता अंतिम संस्कार करण्यात आले. यांच्या दुःखद निधन याबद्दल भदन्त डॉ उपगुप्त महाथेरो रिपाईचे नेते प्रकाश कांबळे भारतीय बौद्ध महासभेचे शामराव जोगदंड अमृतराव मोरे वारा काळे बळीराम खरे मुगाजी खंदारे ती झेड कांबळे श्रीकांत हिवाळे बौद्धाचार्य त्रंबक कांबळे बौद्धाचार्य तुकाराम ढगे किशोर ढाकरके अतुल गवळी आदींनी दुःख व्यक्त केले....
0 टिप्पण्या