💥घटनेतील अत्याचारी पोलिस अधिकारी यांच्यासह सहकारी कर्मचाऱ्यांवरार गुन्हे दाखल करण्याची मागणी💥
जालना (दि.३१ मे २०२१) शहरातील एका खाजगी रुग्णालयाल प्रशासनाला जास्त बिल का आकारले असा जाब विचारणाऱ्या भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारीयालवाले यांना रुग्णालय प्रशासनाच्या इशाऱ्यावर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर पोलिस निरिक्षक प्रशांत महाजन यांच्यासह सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाची मारहाण करीत जातीय शिविगाळ केली होती या घटने संदर्भातील विडिओ संपूर्ण सोशल मिडियावर व्हायरल झाले होते.
या घटने संदर्भात आज सोमवार दि.३१ मे २०२१ रोजी पुर्णा येथील अहीर गवळी समाज बांधवांच्या वतीने समाजातील युवा नेतृत्व राजेश मोहनलाल यादव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसिलदार पल्लवी मेटकर यांची भेट घेऊन जालना येथील घटनेचा तिव्र निषेध नोंदवत निवेदन दिले या निवेदनात असे नमूद करण्या आले की घटनेतील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे यावेळी या शिष्टमंडळात अमर यादव.राजेश शामलाल यादव.रवी यादव.विजु यादव.रमेश यादव.सौरभ यादव.कालु यादव.भोला यादव.महेश यादव.हरीश यादव. कृष्णा यादव. बबलू यादव.विठल मोतीराम यादव आदींची उपस्थिती होती....
0 टिप्पण्या