💥मनपा प्रशासन अधिकाऱ्यांच्या मेडिकल बोर्डाद्वारे मानसिक तपासण्या करा - प्रहार जनशक्ती पक्ष
परभणी (दि.१५ मे २०२१) - महानगरपालिका प्रशासनाने काल दि. १४/०५/२०२१ रोजी एक अजब फतवा काढुन कोवीड संक्रमण विरोधी लस घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरीकांना आर.टी.पी.सी.आर. टेस्ट सक्तीचा करण्यात आला आहे. शहरामध्ये अगोदरच लसीकरणाची आकडेवारी अत्यंत कमी असुन अशा प्रकारच्या विचित्र आदेशाने लसीकरण मोहिमेवर मोठया प्रमाणावर परिणाम पडणार असुन आज दि.१५/०५/२०२१ रोजी शहरातील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरीक येत नाहीत असे चित्र सर्वत्र दिसत आहे. केंद्र शासन, राज्य शासन किवा आरोग्य विभाग यांच्या मार्फत कुठल्याही प्रकारचा आदेश नसतानाही परभणी शहर महानगरपालिका प्रशासनाने असा निर्णय घेऊन लसीकरण मोहिम बाधीत करण्याचे ठरवले आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो.
महानगरपालिकेच्या विविध आर.टी.पी.सी.आर. केंद्रावर तपासणी केली असता आठ ते दहा दिवस तपासणी अहवाल प्राप्त होत नाही. इतका भोगळ कारभार असताना तो सुधारण्या ऐवजी लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना आर.टी.पी.सी.आर. तपासणीची सक्ती करण्यामागे प्रशासनाचा काय हेतु आहे हे कळायला मार्ग नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लसीकरणाची आकडेवारी वाढविण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात असताना परभणी शहर महागरपालिका प्रशासन मात्र नागरीकांना लसीकरण केंद्रापर्यंत आणण्याचे प्रयत्न करण्याऐवजी आर.टी.पी.सी.आर. सक्ती सारखे विचित्र निणय घेऊन लसीकरण मोहिम मंदावण्याचा प्रयत्न करीत आहे. मागील अनेक महिन्यापासुन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शहरामध्ये वार्डनिहाय आर.टी.पी.सी.आर. केंद्र सुरु करावेत अशी विनंती केली होती त्यावर मा. जिल्हाधिकारी परभणी यांनी आयुक्त परभणी शहर महानगरपालिका यांना एक महिन्यापूर्वी आदेशीत करुनही त्यांनी केंद्र सुरु केली नाहीत. महानगरपालिकेचा आर.टी.पी.सी.आर. तपासणीची अत्यंत कमी असलेली आकडेवारी लपविण्यासाठीच मनपा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे हे स्पष्ट आहे. परभणी शहर महानगरपालिकेने लसीकरण केंद्रावर सक्तीचे करण्यात आलेले आर.टी.पी सी.आर. तपासणी तात्काळ बंद करुन जास्तीत जास्त नागरीकांना लस उपलब्ध करुन द्यावी या मागणी चे निवेदन श्री. दिपक मूगळीकर, जिल्हाधिकारी परभणी यांची भेट घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने व पदाधिकाऱ्यांनी दिले.
तसेच परभणी शहर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कोवीड काळात घेण्यात आलेले वेगवेगळे विचित्र निर्णय पाहता महानगरपालिका प्रशासन अधिकाऱ्यांचे मानसिक स्थिती बिघडल्याचे जाणवत आहे. करीता मेडिकल बोर्डाद्वारे यांची मानसीक स्थिती तपासण्यात यावी अशी विनंती देखील या निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, शहर प्रमुख पिंटू कदम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत...
0 टिप्पण्या