💥खरीफ हंगामातील पिकांसाठी खत खरेदी करतांना खत विक्रेत्यांच्या आर्थिक पिळवणूकीला बळी पडू नका💥
पुर्णा (दि.२७ मे २०२१) : तालुक्यात मागील चार ते पाच वर्षापासून झालेल्या नापिकीमुळे निर्माण झालेल्य दुष्काळ सदृष्य परिस्थितीतून अन्नदाता शेतकरी सावरण्याचा प्रयत्न करीत मागील वर्षी सुध्दा शेतकऱ्यांना जेमतेम उत्पन्न झाले परंतु कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन संचारबंदीत झालेल्या उत्पन्नाची मार्केट बंद राहिल्याने विक्री करायची तरी कशी ? या गंभीर प्रश्नामुळे त्रस्त झालेल्या शेतकरी बांधवांना याही वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने लावलेल्या डॉकडाऊन संचारबंदीमुळे अनेक अडचणींना तोंड देत खरीफ हंगामाच्या पेरण्या कराव्या लागणार आहे.
या अटीतटीच्या परिस्थितीतही अन्नदात्या शेतकऱ्यांच्या पिळवणूकीला टपलेले डोमकावळे निश्चितच खत-बियान खरेदी करतेवेळी लचके तोडण्याची शक्यता नाकारता येत नाही बोगस बियानांसह खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून अव्वाच्या सव्वा दराने विक्री करून शेतकऱ्यांच्या आर्थिक फसवणूकीचे प्रकार निश्चितच होणार असल्याने तालुका कृषी विभागासह प्रशासन व जनहीतवादी प्रसार माध्यमांना अत्यंत जागृत राहण्याची आवश्यकता निर्माण होणार असून ७ जुन २०२१ रोजी पावसाळ्याला सुरूवात होण्यास अवघे दहा ते अकरा दिवस बाकी असून खरीप हंगामाला होणार असल्याने तालुक्यात शेतकऱ्यांकडून खरीप हंगामासाठी रासायनिक खते व बियाणे खरेदीची लगबग सुरू आहे.
माहे एप्रिल २०२१ पासून युरीया वगळता इतर रासायनिक खतांची दरवाढ खत उत्पादक कंपन्यांनी केली होती केंद्र शासनाने २० मे २०२१ च्या निर्देशानुसार या कंपन्यांना वाढीव किंमतीसाठी अनुदान देण्याचे घोषीत केले आहे. त्यामुळे खत विक्रेता दुकानदारांनी खते जुन्याच दराने विक्री करावयाची आहे शासनाच्या आदेशानंतरही काही संधीसाधू धुर्त खत विक्रेते वाढीव दराप्रमाणेच छापील किंमतीवर खते विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते.
ज्या खत विक्रेत्यांकडे वाढीव दरातील खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यांनी सुधारीत दराप्रमाणेच खते विक्री करावी. शेतकऱ्यांनी सुद्धा खत खरेदी करतिंना सुधारीत दरांप्रमाणेच खते खरेदी करावी. सुधारीत दरांपेक्षा वाढीव दराने खतांची विक्री होत असल्यास किंवा तसे निदर्शनास आल्यास शेतकऱ्यांनी आपल्या संबंधीत तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी, पंचायत समितीचे कृषि अधिकारी किंवा जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा कक्षातील अधिकाऱ्यांशी साधावा आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक व मोहिम अधिकारी, जिल्हा परिषद परभणी कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रितसर तक्रार करावी तालुक्यातील शेतकऱ्यांनी खतांची खरेदी करतांना पुढील दरा प्रमाणेच खरेदी करावी..
💥असे आहेत रासायनिक खत कंपनीचे सुधारीत विक्री दर (प्रति बॅग 50 किलो)💥
खताचा प्रकार ग्रेड : डिएपी – इफ्फको १२००/- रूपये, जीएसएफसी १२०० रूपये,जय किसान १२००/-रूपये,कोरोमंडल १२००/- रूपये, महाधन १२००/-रूपये, कृभको १२००/- रूपये,१०:२६:२६ - इफ्फको ११७५/- रूपये,जीएसएफसी ११७५/- रूपये,जय किसान १३७५/- रूपये,कोरोमंडल १३००/- रूपये, महाधन १३९० रूपये, कृभको १३००/-रूपये,१२:३२:१६ - इफ्फको ११८५/- रूपये, जीएसएफसी ११८५/- रूपये,जय किसान १३१०/- रूपये, महाधन १३७०/- रूपये, कृभको १३१०/- रूपये,२०:२०:०:१३- इफ्फको ९७५/- रूपये,जय किसान १०९०/- रूपये, कोरोमंडल १०५०/- रूपये,आरसीएफ ९७५/-रुपये, महाधन ११५० रूपये, कृभको १०५०/- रूपये, १९:१९:१९ - जय किसान १५७५/- रूपये. २८:२८:०० - जय किसान १४७५/- रूपये,कोरोमंडल १४५०/- रूपये, १४:३५:१४ - जय किसान १३६५/- रूपये, कोरोमंडल १४००/- रूपये, २४:२४:०:८५ - कोरोमंडल १५००/-रूपये, महाधन १४५०/- रूपये,१५:१५:१५:०९ - कोरोमंडल ११५०/- रूपये,१६:२०:०:१३– कोरोमंडल १०००/- रूपये, १५:१५:१५ – आरसीएफ १०६०/- रूपये, १४:२८:०० – महाधन १२८०/-रूपये,१६:१६:१६ – महाधन ११२५/- रूपये,एमओपी - कृभको ८५०/-रूपये....
नोट ; संबंधित खतांचे दर बुलढाना जिल्हा कृषी विभागाकडून जारी करण्यात आलेले असले तरीही संबंधित दरांत आणि परभणी जिल्ह्यातील खतांच्या दरात विशेष असा फरक राहणार नाही...
0 टिप्पण्या