💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्याकडे मागणी💥
परभणी - शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील डॉक्टर लाईन बसस्टॅन्ड रोडवरील मुख्य नाला,दिग्गी बालाजी रोड वरील नाला, ललितकला भवन रोड वरील नाला व नांदखेडा रोड वरील नाला हे प्रमुख मोठे नाले दरवर्षी मान्सून सुरु होण्याच्या साधारण एक महिना अगोदर मान्सूनपूर्व तयारी म्हणुन साफ केले जातात तसेच शहरातील इतर मध्यम स्वरुपाचे व पाणी तुंबण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या नाल्यांचीही सफाई केली जाते परंतु या वर्षी मात्र नाले सफाई वेळेवर झालेले नाही. शहरातील सर्व मुख्य नाले हे कचऱ्याने तुडुंब भरले असुन याची साफसफाई पावसाळा सुरु होण्या अगोदर करणे अत्यंत गरजेचे आहे आणि ती त्वरित करावी या मागणी साठी आज प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने व प्रहरच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्ट मंडळाने श्री. दिपक मुगळीकर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले व शहरातील कचऱ्याने भरलेल्या सर्व प्रमुख मोठ्या नाल्याचे फोटो पुरावा म्हणून सादर केले.
दरवर्षी नाल्यांची साफसफाई करुनही शहरातील डॉक्टर लाईन, नारायण चाळ, बसस्टॅन्ड, गांधीपार्क व गुजरी बाजार या व्यापारी प्रतिष्ठाने असलेल्या भागामध्ये अनेकदा पाणी तुंबल्याच्या घटना घडलेल्या आहेत या सर्व पार्श्वभूमीचा विचार करुन महानगरपालिकेने दक्षता घेणे आवश्यक आहे . मान्सुन सुरु होण्यासाठी आवघे १५-२० दिवस शिल्लक असतानाही परभणी शहर महानगरपालिका प्रशासन मात्र या गंभीर विषयाकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत आहे . आपणास विनंती आहे की आपण परभणी शहर महानगरपालिकाला प्रशासनाला सूचना देऊन तात्काळ हे सर्व नाले साफसफाईचे काम महागरपालिका प्रशासनास करावयास सांगणे जर लवकरात लवकर या नाल्यांची सफाई झाली नाही तर प्रहार जनशक्ती पक्ष परभणी महानगरपालिका प्रशासनाच्या विरुध्द आंदोलन करेल याची नोंद घ्यावी असे ही या निवेदनात म्हंटले आहे.
0 टिप्पण्या