💥जिल्ह्यात आज रविवारी रुग्णालयात उपचारा दरम्यान ८ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू 💥
परभणी (दि.२३ मे २०२१) - परभणी जिल्हात आज रविवार दि.२३ मे २०२१ रोजी मागील दोन दिवसांच्या तुलनेत पुन्हा कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत असून आज रविवारी जिल्ह्यात तब्बल ५४० कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याची व प्रशासकीय निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनासह पोलिस प्रशासन कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढू नयें याकरिता सातत्याने प्रयत्न करीत असतांना मात्र नागरिकांकडून प्रशासकीय निर्देशांचे जवाबदारीने पालन होत नसल्या कारणाने पुन्हा कोरोना महामारीचा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात आज रविवार दि.२३ मे २०२१ रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधोपचार घेऊन पुर्णपणे बरे झालेल्या १०८ रुग्णांना रुग्णालय प्रशासनाने सुट्टी दिली असून जिल्ह्यात आज रविवारी रुग्णालयात उपचारा दरम्यान ८ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात आजपर्यंत ४८४०१ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून यशस्वी उपचारा नंतर आजपर्यंत ४३७९४ कोरोनाबाधीत कोरोनामुक्त झाले आहेत तर जिल्ह्यात आजपर्यंत ११९८ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने एका प्रेसनोट द्वारे कळवले आहे...
0 टिप्पण्या