💥असे परखड शब्दांत मे.मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.रवींद्र घुगे आणि बी.यू.देबडवार यांनी सुनावले💥
औरंगाबाद : नादुरुस्त कृत्रिम श्वसन यंत्राबाबत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून सादर करण्यात आलेले शपथपत्र म्हणजे यंत्रणा चांगली पण ती हाताळणारे अयोग्य असल्याचे सांगत असून यातून संबंधित विषयाबाबतची असंवेदनशीलताच दिसून येत आहे, असे परखड शब्दांत मे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे बी. यू. देबडवार यांनी सुनावले.
नादुरुस्त व्हेंटिलेटर संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी सादर केलेला अहवाल आणि संबंधित यंत्रणा वापरणाऱ्या आठ तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेला अहवाल याबाबत तसेच त्यांच्या दुरुस्ती वा वापरण्यायोग्य करण्याबाबत कोणतेही भाष्य केले नाही मात्र व्हेंटीलेटर उत्पादकांच्या वतीने बाजू मांडण्याच्या अविर्भावात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने सादर करण्यात आलेले शपथपत्र हे त्यांची या विषयाबाबतची असंवेदनशीलता दर्शविणारे आहे.
असे परखड मत करोनाच्या संदर्भाने प्रकाशित वृत्तांवरून दाखल जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान खंडपीठाने व्यक्त केले घाटी रुग्णालयाला पंतप्रधान कल्याण निधीमधून प्राप्त झालेल्या व्हेंटीलेटरसंदर्भात सुनावणीवेळी खंडपीठाने केंद्र शासनातर्फे दाखल शपथपत्राबाबत असमाधान व्यक्त केले रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेले हे व्हेंटीलेटर रुग्णांसाठी पूर्ण क्षमतेने वापरता यावेत ही शासनाची प्राथमिकता हवी नादुरुस्त व्हेंटीलेटर्स दुरुस्तीसंदर्भात वा इतर पर्याय याबाबत केंद्र शासनाच्या वकिलांनी पुढील सुनावणीत म्हणणे सादर करावे असे निर्देश खंडपीठाने दिले...
0 टिप्पण्या