💥शेतकऱ्याचे उस जळून १ लाख ५० हजार रुपयांचे झाले नुकसान💥
पूर्णा ; तालुक्यातील चुडावा येथील शेतकरी त्र्यंबक गंगाधर देसाई यांचा चुडावा शिवारातील गट नंबर २५७ मधील ५३ गुंठे उस ३३ के व्ही सप्लायच्या तारेला स्प्राकिंग (शार्ट सर्किट) होवुन आग लागल्याने उस जळून एक लाख पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले म्हणून चुडावा पोलिस स्थानकात अकस्मात जळीत म्हणून दाखल करण्यात आले आहे.
चुडावा परीसरातील शेतकरी त्र्यंबक गंगाधर देसाई यांचा २५७ गट नंबर मधील ५३ गुंठे उस आडसाली उस लागवड करण्यासाठी बेणे ठेवलेले मंगळवार दि.११ मे २०२१ रोजी शार्ट सर्किट होवुन पडलेल्या आगीच्या गोळ्याने उस जळुन खाक झाला.त्यात एक लाख पन्नास हजार रुपयाचे नुकसान झाले आहे योग्य ती चौकशी करुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी यांनी केली आहे अधिक तपास बिट जमादार पंडित पवार करीत आहेत.
*********************************************
💥त्र्यंबक देसाई शेतकरी चुडावा💥
चुडावा एम एस इ बी आधिकारी व कर्मचारी यांनी लोंबकळत असलेल्या तारा ,खांब्यावर गेलेल्या वेलीकडे वेळीच लक्ष दिल्यास शेतकरी बांधवाचे नुकसान होणार नाही . वर्षेभर लेकरासारखा सांभाळलेला उस जळुन खाक झाला याला कोण जबाबदार लाइनमेन फोन उचलत नाहीत घरीच राहुन खाजगी व्यक्ती करवी कामे करतांना नेहमी शेतकरी बांधवांनकडुन विद्युत दुरुस्तीसाठी आर्थिक पिळवणूक केली जाते याकडे वरिष्ठ आधिकारी बांधवांचे अक्षम्य दुर्लक्ष आहे असे नुकसानग्रस्त शेतकर्याने सकाळकडे बोलून मत व्यक्त केले आहे .
0 टिप्पण्या