💥शहरातील व्यापाऱ्यांना पो.नि.भुमे यांच्याकडून व्यापाऱ्यांचा सातत्याने छळ उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांडे तक्रार💥
परभणी (दि.२६ मे २०२१) - जिल्ह्यातील सेलू येथील पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक गोवर्धन भुमे यांच्या उर्मट व आडमूठ कारभाराच्या विरोधात कापड व्यापारी असोसिएशनने आज बुधवार दि.२६ मे २०२१ रोजी तिव्र निषेध नोंदवत एका निवेदनाद्वारे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार नोदवली आहे.
उपविभागीय अधिकाऱ्यांना कापड व्यापारी असोसिएशनने आज बुधवार दि.२६ मे रोजी एक निवेदन सादर केले. त्या निवेदनाद्वारे निरीक्षक भुमे यांचे उमर्टपणाचे धोरण तसेच हेतूतः काही व्यापाऱ्यांच्या विरोधात हेतुपुरस्कर सुरू केलेल्या कारवाईंबद्दल तीव्र आक्षेप नोंदविला शहरातील काही व्यापाऱ्यांना हेतूतः पोलिस स्थानकात नेऊन त्यांना एखाद्या गुन्हेगारा प्रमाणे दिवसभर बसवणे. अपमानास्पद वागणुकीसह अव्वा की सव्वा दंड आकारणे तसेच आरेरावीची भाषा वगैरे गोष्टी नित्याच्या झाल्या आहेत त्यामुळे शहरातील व्यापारी त्रस्त झाले आहेत उपविभागीय पोलिस अधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर कापड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पटवारी, सचिव अमोल मिटकरी, उपाध्यक्ष पारस काला, सहसचिव विजय मेहता, सल्लागार नंदकिशोर कासट, डॉ.विलास मोरे यांच्यासह अन्य व्यापाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत....
0 टिप्पण्या