💥कॉलेज प्रशासनाने आयोजित केलेल्या ऑनलाइन सर्च परिक्षेत इयत्ता १० वी १२ वीच्या विद्यार्थांना घेता येणार सहभाग💥
परभणी (दि.२२ मे २०२१) - परभणी येथील मराठवाडा शिक्षण प्रसारण मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजच्या वतीने ऑनलाईन सर्च परिक्षा -२०२१-२२ चे मंगळवार दि.२५ मे २०२१ रोजी सकाळी ११-०० वाजता आयोजन करण्यात आले असून या परिक्षेत इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार असून या परिक्षेत नाव नोदवण्याची अंतीम तारीख रविवार दि.२३ मे २०२१ सायं.५-०० वाजेपर्यंत विद्यार्थांना ऑनलाईन सर्च परिक्षेत नाव नोंदणी करता येणार असून या परिक्षेत सहभागी विद्यार्थ्यांना ऑनलाईन सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
ऑनलाईन सर्च परिक्षा -२०२१-२२ मध्ये सहभागी विद्यार्थांसाठी आकर्षक बक्षिस ठेवण्यात आली असून यात प्रथम पारितोषिक १०००/- रुपये,द्वितीय पारितोषिक ७००/- रुपयें तर तृतीय पारितोषिक ५००/-रुपये ठेवण्यात आले असून परिक्षेत सहभागी होणाऱ्या प्रथम ५० विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी विशेष सवलत देण्यात आली असून या परिक्षेत सहभाग नोदवणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी ९५११६५४२५२/९४०४२४६२७८/९९७०६३३१४३/८०८७१७७४७२ या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन कॉलेज प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे....
0 टिप्पण्या