💥पवित्र रमजान महिण्यात एका भावाने आपल्या भगिनींना दिला साडी-चोळीचा आहेर💥
पुर्णा (दि.१४ मे २०२१) - कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने संपूर्ण राज्यात लॉकडाऊन संचारंदीची घोषणा केली ऐन पवित्र रमजान महिण्यात जिल्हासह पुर्णा तालुक्यातही लागू झालेल्या लॉकडाऊन संचारबंदी मुळे शहरातील मस्तानपूरा या रोजमजूर-शेतमजूर कामगार हातगाड्यांवर व्यवसाय करणारे लहाण व्यवसाईक तसेच घरकाम करणाऱ्या माता-भगिनी यांच्यावर व्यवसाय बंद असल्यामुळे अक्षरशः उपासमारीची वेळ आली अश्या या हालाखीच्या परिस्थितीत पवित्र रमजान महिण्याचा सन साजरा करणार कसा अश्या परिस्थितीत जेमतेम सन साजरा केला तरी या पवित्र महिण्यात कुंटुंबातील अत्यंत महत्वाचा धुरा समजल्या जाणाऱ्या माता-भगिनी नवीन साडी-चोळी पासून वंचित राहता कामा नयें हा एकमेव उद्देश मनात बाळगून सामाजिक बांधिलकी जोपासत या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेता शेख सरान बागवान यांनी रमजान ईद या सनाच्या वेळी एका भावाची भुमिका पार पाडत परिसरात दिडशें माता-भगिनींना साडी-चोळीचा आहेर करून एका भावाचे कर्तव्य पार पाडल्याने त्यांच्या या भुमिकेचे सर्वच स्तरातून कौतूक होत असून परिसरातील माता-भगिनी आपल्या या भावासाठी अल्लाह कडे दुवाँ मागत आहेत...
0 टिप्पण्या