💥औरंगाबाद शहराचा पॉझिटिव्हीटी रेट 0.64 टक्क्यांवर ; जिल्ह्यात आजपर्यंत 139623 कोरोनामुक्त💥
💥जिल्ह्यात आजपर्यंत 144694 एकूण बाधित,1729 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरू💥
औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील नव्याने आढळून येणार्या बाधित रुग्णांचा आकडाही दिवसेंदिवस घटत असून शहराचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट ही घटल्याचे दिसून येत आहे. आज 13 जून 2021 रोजी शहराचा चाचण्यांमध्ये बाधित होणार्यांचा दर 1 टक्क्यांहून खाली म्हणजे 0.64 पर्यंत घसरला आहे. . औरंगाबाद शहरात आज 14 कोरोना बाधित रुग्णांची नव्याने भर पडली. तर औरंगाबाद जिल्ह्यात आज 229 जणांना (मनपा 15, ग्रामीण 214) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 139623 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 113 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 144694 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3342 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1729 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
💥शहराचा बाधित होणारांचा दर 0.64 % :-
औरंगाबाद शहराचा कोरोनाचा रिकव्हरी रेट आज 13 जून 2021 रोजी 97. 65 % नोंदला गेला. शहराचा कोरोनाचा मृत्यु दर आज 13 जून 2021 रोजी 2.19 % तर जिल्ह्याचा 2.30 % आहे. 13 जून 2021 रोजी कोरोनाचा शहराचा बाधित होणारांचा दर 0.64 % तर एकूण दर 10.98 % नोंदला गेला.
💥शहरात 2984 नागरिकांच्या चाचण्या ;-
औरंगाबाद शहरात आज 13 जून 2021 रोजी मनपा आणि विविध केंद्रांवर एकूण 2984 नागरिकांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये महापालिकेच्या वतीने 2513 अँटीजन चाचण्या घेण्यात आल्या. यात 4 पॉझिटिव्ह आढळले . विविध केंद्रांवर अँटीजन चाचण्यात 5 पॉझिटिव्ह आढळले . आज दिवसभरात एकूण 471 जणांचे स्वॅब तपासण्याठी घेण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या प्राप्त होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
💥रेल्वे स्टेशन व विमानतळ येथे 96 प्रवाशांची कोरोना चाचणी💥
औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने शासन निर्देशानुसार रेल्वे स्टेशन, विमानतळ येथे प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे .
1) रेल्वेस्टेशन येथे 13 जून 2021 रोजी 83 प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. 12 जून रोजी घेण्यात आलेल्या टेस्टचा रिपोर्ट 13 जून रोजी प्राप्त झाला असुन यात कोणीही प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आले नाहीत.
2) विमानतळ येथे 13 जून 2021 रोजी 13 प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली.
💥एंट्री पॉईंट कोरोना चाचणी 2412 पैकी 2 पॉझिटिव्ह :-
औरंगाबाद महानगर पालिकेच्या वतीने 20 मार्च 2021 पासून अन्य जिल्ह्यातून अथवा बाहेरून शहरात येणाऱ्या नागरिकांची शहरातील एंट्री पॉईंटवर अँटीजन टेस्ट करण्यात येत आहे . आज 13 जून 2021 रोजी शहरातील 6 एंट्रीपॉईंट वर कोरोना अँटीजन चाचणी करण्यात आली.यात
1) चिकलठाणा येथे 269 पैकी 1 पॉझिटिव्ह आढळले आहेत.
2) हर्सूल टी पॉईंटवर 355 पैकी 1 पॉझिटिव्ह आढळले आहेत.
3) कांचनवाडी येथे 260 पैकी 1 पॉझिटिव्ह आढळले आहेत.
4) झाल्टा फाटा येथे 262 पैकी कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.
5) नगर नाका येथे 682 पैकी कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.
6) दौलताबाद टी पॉईंट येथे 584 जणांची टेस्ट करण्यात आली. यात कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.
💥आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे :-
मनपा (14) :
रेल्वे स्टेशन रोड 1, राजनगर 1, सावता नगर 1, पुडंलिक नगर 1, एन-4 सिडको 1, मयुर पार्क हर्सुल 1, म्हाडा कॉलनी 1, रायगड 1, पुडंलिक नगर 1,ज्योती नगर 1, अन्य 4
ग्रामीण (99) :
ता.फुलंब्री 1, ठाकरे चौक ता.खुलताबाद 2, पळशी 1, ता.पैठन 1,कमलापूर रांजणगाव 1, बजाज नगर 3, सिडको वाळूज 3, सांजूळ ता.फुंलब्री 1, ता.गंगापूर 1, ता.पैठन 1, अन्य 84
मृत्यू (11) :
घाटी (08) :
1. स्त्री/40/ चंदापूर, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद
2. स्त्री/70/ करमाड ता.औरंगाबाद जि.औरंगाबाद
3. स्त्री/51/ सिडको जि.औरंगाबाद
4. पुरष/60/ बिडकीन ता.पैठन जि.औरंगाबाद
5. स्त्री/36/ धानोरा ता.सिल्लोड जि.औरंगाबाद
6. पुरष/35/ सिंदोळ ता.सोयगाव जि.औरंगाबाद
7. पुरष/57/ दौलताबाद ता.औरंगाबाद जि.औरंगाबाद
8. पुरुष/75/ चिकलठाणा ता.औरंगाबाद जि.औरंगाबाद
खासगी रुग्णालये (3) :
1. पुरुष/65/ कसाबखेडा, खुलताबाद
2. पुरुष/67/ हडको, औरंगाबाद
3. स्त्री/69/ बन्सीलाल नगर, औरंगाबाद
0 टिप्पण्या