💥विकास आराखड्या संदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे होणार सादर💥
✍️किरण घुंबरे पाटील
परभणी (दि.०४ जुन २०२१) - जिल्ह्यातील पाथरी येथील श्री साईबाबा विकास आराखड्याच्या सुधारित मंजुरीसाठी आज शुक्रवार ४ जुन रोजी मंत्रालयात बैठक झाली या वेळी राज्याचे मुख्य सचिव सीतारामजी कुंटे बैठकीस वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव (नियोजन), राज्याचे पोलीस महासंचालक, नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी, आ बाबाजानी दुर्रानी, परभणी जिल्हाधिकारी, पाथरी नगरपरिषद मुख्याधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते या वेळी राज्याचे मुख्य सचिव सीतारामजी कुंटे यांचा संत श्री साईबाबांची मूर्ती देऊन आ.बाबाजानी दुर्रानी यांनी सत्कार केला.
पाथरी साई जन्मभूमी मंदिर व परिसराचा विकास व्हावा यासाठी आ दुर्रानी यांनी अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होते. साईबाबा मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा परभणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाला सादर करण्यात आला होता. यानंतर आ दुर्रानी यांनी या कृती आराखड्यास मंजुरी मिळवण्या साठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यानंतर त्यावर आज मंत्रालयात मुख्य सचिव यांच्या अध्यक्षते खाली गठीत करीत करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीची बैठक संपन्न झाली.
या विषयी अधिक माहिती देतांना आ दुर्रानी म्हणाले की,सदर बैठकीत विविध बाबींवर सकारात्मक चर्चा झाली असून यावरील प्रस्ताव सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या कडे सादर करण्यात येणार आहे. लवकरच या आराखड्यास मंजुरी मिळणार आहे. परिणामी मागील अनेक वर्षांपासून रखडलेला श्री साईबाबा जन्मभूमी तिर्थक्षेत्राचा विकास साधला जाणार असल्याची माहिती आ बाबाजानी दुर्रानी यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक वरुन दिली आहे....
0 टिप्पण्या