💥राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भरत घनदाट यांना नियुक्तीपत्र देऊन या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या💥
✍️प्रसाद पौळ
परभणी (दि.१७ जुन २०२१) - गंगाखेड विधानसभेचे माजी आमदार सीताराम घनदाट यांचे नातू भरत घनदाट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नुकतीच निवड झाली. ही निवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील यांनी भरत घनदाट यांना नियुक्तीपत्र देऊन या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या. या निवडीने गंगाखेड मतदार संघामध्ये राष्ट्रवादीचे पारडे जड होणार हे मात्र निश्चित आहे . येणाऱ्या काळात राजकीय वातावरण व मतदार संघात आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या माजी, आमदार सीताराम घनदाट यांच्या जोरात हालचाली सुरू झाल्या आहेत.आपल्या कामाने व राजकीय व सामाजिक कार्याने नेहमी सर्व सामान्य माणसाला अपलसं वाटणार व्यक्तीत्व म्हणून घनदाट मामांची ओळख आहे
हेच आदर्श घेऊन त्यांच्या पावलावर पाऊल टाकत भरत घनदाट हे काम करत आहेत . त्यानी आत्तापर्यंत सामाजिक राजकीय शैक्षणिक कार्यात मोठ्या प्रमाणात काम केले आहे तसेच अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे नेहमी युवा पिढीत ते आदर्श निर्माण करत आहेत तर युवकांना हवं असलेले नेतृत्व मिळालं आहे. याचाच एक भाग त्यांच्या कामाची पावती आज त्यांना पक्षाकडून निवडिच्या रुपात मिळाली.या निवडिने सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने त्यांच स्वागत केले जात आहे.
0 टिप्पण्या