नांदेड (दि.०९ जुन २०२१) येथील गुरुद्वारा तखत सचखंड बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि शीख समाजातील एक प्रभावी नेते म्हणून ओळख असलेले स. लड्डूसिंघ महाजन यांचा 75 वा वाढदिवस अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या रूपात साजरा करण्याचा निर्णय सामाजिकस्तरावर घेण्यात आला होता.
या निमित्त एक अमृतमहोत्सव समितीची स्थापना माजी आमदार श्री ओमप्रकाश पोकरणा यांच्या अध्यक्षतेखाली होऊन दि. 10 जून रोजी त्यांचा अमृतमहोत्सव साजरा होणार होता. पण दोन आठवड्यापूर्वीच स. लड्डूसिंघ महाजन यांनी वर्तमान परिस्थितीत कोरोना संक्रमणाची गंभीर अवस्था पाहून अमृतमहोत्सव कार्यक्रम पुढे ढकलण्याचा प्रस्ताव समितीपुढे मांडला. आणि समितिने देखील विषयाची गंभीरता पाहता हा नियोजित कार्यक्रम पुढे चांगल्या व स्वस्थ वातावरणात कार्यक्रम साजरा करण्याचा मानस व्यक्त करत तसेच दि. 10 जून, 2021 रोजी ठरलेले नियोजित धार्मिक कार्यक्रम पार पाडण्याचा मैत्रीपूर्वक सल्ला दिला. स. लड्डूसिंघ महाजन हे जागरूक नेते असल्याने त्यांनी घेतलेला निर्णय सर्वथा योग्यच असून त्यांचे निर्णय स्वागतार्ह असल्याचे मत अमृतमहोत्सव समितीचे समन्वयक पत्रकार स. रवींद्रसिंघ मोदी यांनी मांडला आहे.
रवींद्रसिंघ मोदी यांनी पुढे म्हंटले आहे की अमृतमहोत्सव साजरा करण्याच्या भावनेने 10 जून, 2021 तारखेला गुरुद्वारा तखत सचखंड श्री हजूर साहिब येथे आयोजित श्री अखंडपाठ साहबची समाप्ति सकाळी पूर्व निर्धारित कार्यक्रमानुसार होणार आहे त्या धार्मिक कार्यक्रमात बदल अपरिहार्य आहे. याप्रसंगी तखत साहेबचे सन्मानीय जत्थेदार साहेब आणि माननीय पंजप्यारे साहिबान यांचे आशीर्वाद घेण्याचे कार्यक्रम तटस्थ ठेवणे श्रद्धेचे एक भाग होय. श्री अखंडपाठ साहेब समाप्ति निमित्त महाजन कुटुंबीयातर्फे गुरुद्धाच्या लंगर मध्ये लंगरप्रसाद कार्यक्रमाची अरदास व धार्मिक कार्यक्रम कौटुंबिकस्तरावर साजरा करण्याचा निर्णय देखील स्वागतार्ह असा आहे.
स. लड्डूसिंघ महाजन यांचे राजकीय, सामाजिक, क्रीडा क्षेत्राशी संबंध अबाधित असून त्यांच्यावर प्रेम करणारा एक मोठा वर्ग आहे. नांदेड पासून दिल्ली, पंजाब, तेलंगाना व इतर राज्यात त्यांचा मित्रवर्ग पसरलेला आहे. अमृतमहोत्सव कार्यक्रम आयोजन संबंधी प्रचार - प्रसार चांगलाच झाला होता. माजी आमदार श्री ओमप्रकाश पोकरणा स्वतः या कार्यक्रमाविषयी मोठे परिश्रम घेत होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली अमृतमहोत्सव समितीच्या अनेक बैठका पार पडल्या नंतर कार्यकामाची आखणी शेवटच्या टप्प्यात होती. पण वेळोवेळी कोरोना संक्रमणाची परिस्थिती गंभीर झाल्याने दोन आठवडेपूर्वीच कार्यक्रम पुढे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये परिस्थितिनुसार कार्यक्रम व्हावा असा विचार पुढे आला. आज प्रसंगी तारखेनुसार स. लड्डूसिंघ महाजन यांचे अभिष्टचिंतन करीत आहे. वरील निर्णय नांदेड, स्थानिक शीख समाज आणि मित्रपरिवारासाठी हिताचे ठरेल व त्याचे दीर्घ सकारात्मक परिणाम समोर येतील असा विश्वास रवींद्रसिंघ मोदी यांनी व्यक्त केला आहे.....
0 टिप्पण्या