💥या कारवाईमुऴे पैशाला चटावलेल्या आधिकारी, कर्मचार्यानां माेठी चपराक💥
सोलापूर,/प्रतिनिधी
आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून प्रांताधिकारी क्रमांक 2 दिपक शिंदे यांना गुरूवारी तडकाफडकी निलंबित केल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे महसूल व वनविभागाचे उपसचिव डॉ. माधव वीर यांनी निलंबनाचा आदेश काढला असून हा आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला आहे.
प्रांताधिकारी शिंदे यांच्याविरोधात जिल्हयातील लोकप्रतिनिधींकडून गंभीर स्वरुपाच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. शिवाय या तक्रारीसोबत आर्थिक देवाण घेवाणीसंदर्भातील ध्वनीफितही दाखल करण्यात आली होती. या ध्वनीफितीतील आार्थिक देवाणघेवाणीचे संभाषण हे गंभीर स्वरुपाचे असल्याने शासनाने शिंदे यांची विभागीय चौकशी करण्याचे ठरविले आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रांताधिकारी शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे....
0 टिप्पण्या