💥भगवान बुद्ध व बोधिसत्व परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प व पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन💥
पूर्णा (दि.०२ जुन २०२१) - तालुक्यातील धनगर टाकळी गावाचे सरपंच तथा समाजसेवक शिवाजीराव साखरे यांनी आपला वाढदिवस कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला.भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो हे त्यांचे श्रद्धा स्थान त्यांना वंदन करण्यासाठी बुद्ध विहारास त्यांनी भेट दिली . महामानव तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
भंते डॉ. उपगुप्त महाथेरो भंते पयावांश यांचे पुष्पगुच्छ देऊन वंदन केले विहार समितीच्यावतीने शाल पुष्प गुच्छ व ग्रंथ देऊन त्यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी श्रीकांत हिवाळे, गौतम वाघमारे, साहेबराव सोनवणे, किशोर ढा करगे अतुल गवळी उमेश बाराटे इंजिनीयर कपील कांबळे शुभम गायकवाड सुरज जोंधळे यांची उपस्थिती होती.
भंते डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी वीहार मार्फत राब विल्या जाणाऱ्या विविध समाज उपयोगी उपक्रमाची माहिती दिली. पूर्णा येथील बुद्ध विहार एक आदर्श संस्कार केंद्र आहे विकास कामासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे त्यांनी याप्रसंगी अभिवचन दिले..
0 टिप्पण्या