💥 सर्व शासकीय कार्यालयातील अँटीजन टेस्ट करण्याच्या मोहिमेस प्रारंभ💥
परळी वैजनाथ (दि.१८ जुन २०२१) :- कोरोना संक्रमणाच्या प्रादुर्भावास आळा घालण्याच्या दृष्टीने बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे व बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या आदेशानुसार सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या अँटीजन टेस्ट करण्याच्या मोहिमेअंतर्गत येथील पंचायत समितीमध्ये तालुका आरोग्य विभागाच्या वतीने अँटीजन टेस्ट कॅम्पचे आयोजन करत सर्वप्रथम पंचायत समितीचे विद्यमान सभापती बालाजी मुंडे यांची अँटीजन टेस्ट करत सर्व शासकीय कार्यालयातील अँटीजन टेस्ट करण्याच्या मोहिमेस प्रारंभ करण्यात आल्याची माहिती परळीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे व जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा प्रशासन तथा जिल्ह्याचा आरोग्य विभाग आता कोरोना संक्रमण रोखण्याच्या दृष्टीने विविध मार्गांचा अवलंब करत असून अधिक सतर्क झाल्याचे दिसून येत आहे. जिल्हाभरात सर्वत्र जिल्हा प्रशासन महसूल विभाग आरोग्य विभाग आदि विभागातील प्रशासकीय यंत्रणेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या ठिकाणी कर्मचारी तथा कार्यालयीन कामानिमित्त येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची अँटीजन टेस्ट करण्याच्या मोहिमेचा आरंभ करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असली तरी देखील अजून धोका टळला नसल्याकारणाने कोरोणा संक्रमणाच्या बाबतीत जिल्ह्यातील प्रशासकीय तथा आरोग्य विभाग कुठलाही धोका पत्करत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी आदेशित केल्याप्रमाणे परळी तालुक्यामध्ये सर्व शासकीय कार्यालयात अँटीजन टेस्ट कॅम्प राबविण्याच्या मोहिमेस आज परळीच्या पंचायत समिती कार्यालयामधून प्रारंभ करण्यात आला.सर्वप्रथम पंचायत समितीचे विद्यमान सभापती बालाजी मुंडे यांची अँटीजन टेस्ट करत या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या तपासणी मोहिमेदरम्यान परळीच्या पंचायत समिती कार्यालयातील आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, स्वच्छता अभियान विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा अभियान विभाग, अंगणवाडी तसेच पशुसंवर्धन यासह विविध विभागातील कर्मचाऱ्यांची तसेच कार्यालयीन कामासाठी येणार्या जाणार्या नागरिकांसह 100 हून अधिक जणांची अँटीजन टेस्ट करण्यात आली. आजच्या परळी पंचायत समिती कार्यालयातील अँटीजन तपासणी दरम्यान एकही कोरोना बाधित रूग्ण आढळून आला नसून ही परळी तालुक्यासाठी आनंददायी बाब असल्याचे डॉ. लक्ष्मण मोरे यांनी सांगितले. यावेळी परळी पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे, गटविकास अधिकारी संजय केंद्रे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे, यांच्यासह पंचायत समितीच्या विविध विभागातील अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते....
0 टिप्पण्या