पुर्णा नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून नुकताच जयवंत सोनवने यांनी पदभार स्विकारला असून श्री.सोनवने यांना शहरातील परिस्थितीची अजून म्हणावी तितकी माहिती नसली तरी त्यांनी शहरातील लहाण-मोठ्या नाल्यांच्या स्वच्छतेच्या दिशेने तात्काळ पावल उचलन आवश्यक आहे कारण शहरातील नाल्या स्वच्छते अभावी अनेक भागात तुंबलेल्या असून पावसाळ्यात त्या नाल्या फुटून त्यातील अस्वच्छ पाण्यासह घाण रस्त्यांसह परिसरातील नागरी वसाहतींमध्ये फैलून रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही शहरातील सांडपाणी वाहून नेणारी मुख्य नाली डोबी गल्ली,अण्णाभाऊ साठे नगर,कोळीगल्ली या नागरी वसाहतीतून वाहणाऱ्या मोठ्या नाल्याला जोडल्या गेलेली असून संबंधित मोठ्या नाल्याची नगर परिषद स्वच्छता विभागाने अद्यापही स्वच्छता केलेली नसून त्याही पेक्षा दुर्दैवी बाब म्हणजे या मुख्य नाल्यावर परिसरातील विटभट्टी चालकांनी बस्तान मांडल्याने हा शहरातील नाल्यांनी जोडला गेलेला मोठा नाला जागोजाग ब्लॉक झाल्याने शहरातील विविध भागातून वाहणारे सांडपाणी तसेच थुना नदीला पुर आल्यानंतर येणारे बॕक वॉटर मुळे या नाल्यातून पाणी पुढे पास झालेच नाही तर पावसाळ्यात या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसून परिसरातील नागरीकांच्या जिवितास फार मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नगर परिषद प्रशासनाची सर्वात मोठी जवाबदारी असते की मान्सुनपुर्व शहरातील लहाण-मोठ्या नाल्यांची स्वच्छता करणे परंतु पुर्णा नगर परिषदेतील निश्क्रिय प्रशासन पावसाळा सुरू होण्यास अवघे चार दिवस बाकी असतांनाही या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे निदर्शनास येत असून अगोदरच संपूर्ण जिल्ह्यासह तालुक्यातही कोरोना महामारीने हाहाकार माजवल्याचे दिसत असतांना या कोरोना महामारीला लगाम लावण्यास प्रशासनाला नाकात दम आला असतांना पुन्हा नगर परिषद प्रशासनाच्या निश्क्रिय कारभारामुळे शहरातील स्वच्छते अभावी शहरात हिवताप मलेरीया,काविळ,गेस्टो,डेंग्यू सारख्या विविध साथींच्या आजारांचा फैलाव झाल्यास यास जवाबदार कोण ? जिल्ह्याचे सन्माननीय कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी तात्काळ पुर्णा नगर परिषद प्रशासनाला सक्तीचे आदेश देऊन शहरातील लहान-मोठ्या नाल्यांच्या स्वच्छतेसह शहरातील विविध भागात पसरलेल्या घाणीच्या साफसफाईकडे लक्ष देण्याचे आदेश जारी करावे अशी मागणी शहरातील नागरीकांतून होतांना दिसत आहे....
0 टिप्पण्या