💥जिल्ह्यात आज बुधवारी एकाही कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू नाही💥
परभणी (दि.०९ जुन २०२१) - परभणी जिल्हात आज बुधवार दि.०९ जुन २०२१ रोजी केवळ ३० कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून जिल्ह्यात आज सुदैवाने एकाही कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला नाही जिल्ह्यात आज बुधवारी कोरोनाबाधीत रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण शुन्य झाल्याने एकंदर जिल्ह्यात दिलासा दायक वातावरण निर्माण झाले असून याचे सर्वस्वी श्रेय आरोग्य प्रशासनातील आरोग्य तज्ञ व आरोग्य कर्मचाऱ्यांसह जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलिस दलाला जाते कारण जिल्ह्यातील आरोग्य विभागातील आरोग्य तज्ञ व कर्मचारी कोरोनाबाधीत रुग्णांचा अत्यंत यशस्वीपणे उपचार करतांना दिसत असल्याने व जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलिस दल लॉकडाऊन संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत असल्याने दिवसेंदिवस कोरोनामुक्तांची संख्या ही वाढतांना दिसत आहे.
जिल्ह्यात आज बुधवार दि.०९ जुन २०२१ रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधोपचार घेऊन पुर्णपणे बरे झालेल्या ६७ रुग्णांना रुग्णालय प्रशासनाने सुट्टी दिली असून जिल्ह्यात आजपर्यंत ५०३१४ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून यशस्वी उपचारा नंतर आजपर्यंत ४८१०६ कोरोनाबाधीत कोरोनामुक्त झाले आहेत तर जिल्ह्यात आजपर्यंत १२४९ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने एका प्रेसनोट द्वारे कळवले आहे...
0 टिप्पण्या