💥४३ कृत्रिम श्वसन यंत्रे,प्राणवायू आणि गॅस दाहिनी प्रकल्पासह कोटय़वधींची मदत💥
औरंगाबाद : करोनाकाळातील गरज लक्षात घेता कमीत कमी कालावधीमध्ये फ्रान्समधून २० आणि अमेरिकेहून १२ यासह ४३ कृत्रिम श्वसन यंत्रं ( व्हेटिंलेटर), १४६ प्राणवायू सांद्रित्रची ( कॉन्संट्रेटर) फिरती मदत याशिवाय पहिल्या टाळेबंदीमध्ये साडेचार लाख तयार खाद्य पदार्थाची पाकिटे अशी मदत औरंगाबादमधील सर्व औद्योगिक संघटनांच्या वतीने करतानाच केलेली मदत कायमस्वरूपी राहावी म्हणून दीड कोटी रुपयांचा निधी जमवून उभा करण्यात आलेला प्राणवायू प्रकल्प सुरू झाला असून सोमवारी त्याचे उद्घाटन केले जाणार आहे.
साथरोगाची दाहकता लक्षात घेऊन औरंगाबाद शहरातील कॉन्फ्रेडेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज, चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अॅड अॅग्रिकल्चर, लघु व मध्यम उद्योगाची मासिआ तसेच औरंगाबाद फर्स्ट या उद्योजकांच्या संघटनांनी टीम ऑफ इंडस्ट्रीज असोसिएशन असा एक समूह तयार केला आणि वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ केली मदत किती झाली या पेक्षाही उद्योग संघटनांनी एकत्र येऊन कसे नव्या पद्धतीने काम केले याची दखल आता केंद्र सरकारच्या नीती आयोगाने घेतली असून या मदतीचा औरंगाबाद पॅटर्न आता चर्चेत येऊ लागला आहे.
जसजशा साथरोगातील समस्या वाढत गेल्या तसतशा बदलत गेलेल्या गरजा आणि केलेली मदत यांची माहिती मुकुंद कुलकर्णी, एन. राम, प्रसाद कोकीळ, कमलेश धूत, प्रतीश चटर्जी, नारायण पवार यांनी पत्रकारांना दिली पहिल्या टप्प्यात आर.टी.पी.सी.आर. चाचण्या कमी होत असल्याने चाचणी यंत्र उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले...
0 टिप्पण्या