💥सिडको भवनापासून दोन किमी अलीकडेच आंदोलकांना रोखले💥
💥महामुंबईसह ठाणे,पालघर जिल्ह्यंतून ४५ हजार प्रकल्पग्रस्त एकवटले पोलीस बंदोबस्त💥
💥आंदोलकांच्या संयमामुळे आंदोलन शांततेत💥
नवी मुंबई : नवी मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याऐवजी प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे याकरिता नवी मुंबई, पनवेल, उरणसह आसपासच्या जिल्ह्यंतील प्रकल्पग्रस्तांनी आयोजित केलेले आंदोलन गुरुवारी शांततेत पार पडले सिडको भवनाला घेराव घालण्यासाठी भल्या सकाळपासून चालून आलेल्या हजारोंच्या जनसमुदायाला पोलिसांनी व्यूहरचना करून सिडको भवनापासून दोन किमी अलीकडेच रोखून धरले त्यानंतर त्याच ठिकाणी झालेल्या जाहीर सभेत नामकरण आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देत आणि निवडक शिष्टमंडळासह सिडको अधिकाऱ्यांकडे याबाबत निवेदन देत आंदोलक माघारी परतले.
दि.बा.पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याच्या मुद्दय़ावरून गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापले आहे राज्य सरकारवर दबाव वाढवण्यासाठी सिडको भवनला घेराव घालण्याचा इशारा देताना प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांनी ठाणे,पालघर आणि रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्रांनाही यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते तसेच एक लाखाहून अधिक प्रकल्पग्रस्त या ठिकाणी जमतील असा दावाही करण्यात येत होता प्रत्यक्षात आंदोलनस्थळी ४० ते ४५ हजारांचा जमाव गोळा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रकल्पग्रस्तांनी सिडको भवनाला घेराव घातल्यास सरकारची नामुष्की होईल या विचाराने पोलीस आयुक्त बिपिन सिंह यांनी आंदोलकांना सिडको भवनापर्यंत पोहोचू न देण्याच्या सूचना पोलिसांना केल्या होत्या....
0 टिप्पण्या