💥जिल्ह्यात आज गुरुवारी जिल्ह्यात २ कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू💥
परभणी (दि.१० जुन २०२१) - परभणी जिल्हात आज गुरुवार दि.१० जुन २०२१ रोजी केवळ २६ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून जिल्ह्यात आज रुग्णालयात उपचारा दरम्यान २ कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आज गुरुवार दि.१० जुन २०२१ रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधोपचार घेऊन पुर्णपणे बरे झालेल्या ८८ रुग्णांना रुग्णालय प्रशासनाने सुट्टी दिली असून जिल्ह्यात आजपर्यंत ५०३४० कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून यशस्वी उपचारा नंतर आजपर्यंत ४८१९४ कोरोनाबाधीत कोरोनामुक्त झाले आहेत तर जिल्ह्यात आजपर्यंत १२५६ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने एका प्रेसनोट द्वारे कळवले आहे...
0 टिप्पण्या