💥गावातील खरे फळ बागायतदार शेतकरी अनुदानापासून वंचित बोगस लाभार्थ्यांनी लाटले अनूदान💥
पुर्णा (दि.१० जुन २०२१) - तालुक्यातील गौर तलाठी सज्जा अंतर्गत येणाऱ्या फळबाग दुष्काळ अनुदान २०१९-२० योजनेत झालेल्या महाघोळाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी गावातील शेतकऱ्यांनी तहसिलदार पल्लवी मेटकर यांच्याकडे एका तक्रार अर्जाद्वारे केली आहे.
💥गौर येथील तलाठी भाजगे यांची फळबाग दुष्काळ अनुदान २०१९-२० योजनेतील लाभार्थ्यांची माहिती देण्यास टाळाटाळ ;
गौर तलाठी सज्ज्जाच्या तलाठी फाजगे यांना येथील शेतकरी नागेश जोगदंड यांनी माहिती अधिकारा अंतर्गत फळबाग दुष्काळ अनुदान २०१९-२० योजनेतील लाभार्थ्यांची माहिती मागीतली असता नमूद तलाठी फाजगे यांनी जोगदंड यांना पंधरा दिवसात माहिती देण्याचे आश्वासन देऊन कालावधी पुर्ण होताच रजा घेऊन निघून गेल्याने तलाठी फाजगे या माहिती देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याने शंकेची पाल चुकचूकतांना दिसत असून सदरील योजनेत मोठ्या प्रमाणात अफरातफर झाल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे....
0 टिप्पण्या