💥जागतिक योग दिन कोरोनाच्या सावटाखाली साजरा💥
जितूर - पतंजली योग समिती व जवाहर विद्यालय जिंतूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग साजरा करण्यात आला आज 7 व्या जागतिक योग दिनी पतंजली योग समितीचे अध्यक्ष डॉ.शिवप्रसाद सानप व प्राचार्य बळीरामजी वटाणे सर,मीडिया प्रभारी सचिन रायपत्रीवार, व योग शिक्षक संतोष चौधरी यांच्या व जवाहर विद्यालयातील शिक्षक व कर्मचारी वृंद यांच्या सानिध्यात सकाळी 7. 30 ते 8.30 या वेळेत साजरा केला .
यामध्ये सामान्य अभ्यासक्रमा नुसार प्रार्थना , मान , कंबरेचे सुक्ष्म व्यायाम सोबत उभे , बैठे पाठीवरचे आणि पोटावरचे आसने व कपालभाती , अनुलोम - विलोम,भ्रमरी, प्रणवध्यान हे चार प्राणायाम घेण्यात आले .सदरील योग सत्र हे यु ट्यूब च्या प्रसार माध्यमातून शाळेतील सर्व विद्यार्थी व पालक यांनी ऑनलाईनद्वारे योगा करत आप आपल्या घरी योग दिन साजरा केला.या वर्षी पण योग दिनावर कोरोनाचा प्रभाव वाढुनये म्हणून याही वर्षी पतांजली योग समितीने शाळेच्या माध्यमातून ऑनलाईन योगाचे पाठ घेतले.....
0 टिप्पण्या