💥माजी विद्यार्थी मेळाव्याच्या अनुषंगाने स्पर्धा-परिक्षा : 'काल,आज,उद्या” याविषयावर मार्गदर्शनाचे आयोजन💥
पालम (दि.०३ जुन २०२१) :- दिनांक 10 जून 2021 वार गुरुवार सकाळी ठिक 11 : 00 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या शिबिराला प्रमुख पाहुणे व प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.सचिन सांगळे ( पोलिस उपअधीक्षक देगलुर ) , मा.गजानन दळवी ( पोलिस उपनिरीक्षक ) , मा. विश्वबंर बापुराव कऱ्हाळे ( नुतन पोलिस उपनिरीक्षक ) , मा.रेखा बन्सी काळे ( पोलिस उपनिरीक्षक राजुरा जि चंद्रपूर ) हे असनार आहेत.
श्री बळीराजा शिक्षण संस्था सोमेश्वर संचलित, माधवराव पाटील महाविद्यालयाने मागील 28 वर्षांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिलेले आहे. ईडा पिडा टळो बळीचं राज्य येवो हे ब्रीदवाक्य कायम लक्षात ठेवून महाविद्यालयाने शेतकरी शेतमजूर आणि गोरगरीब विद्यार्थ्यांच्या जीवनाला यशस्वी आकार देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केलेले आहे.याचाच एक भाग म्हणून माजी विद्यार्थी मेळावा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने स्पर्धा परीक्षा : काल,आज आणि उद्या या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आत्माराम आरसुळे सर आसनार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा.डॉ घ.ना पांचाळ सर ( माजी विद्यार्थी समिती प्रमुख ) , प्रा.डॉ गु.जी निर्वळ सर ( माजी विद्यार्थी समिती सदस्य ) यांनी केले आहे. हे शिबिर पुर्णतः ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे तरी सर्व आजी माजी विद्यार्थ्यांनी आपले रजिस्ट्रेशन करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. रजिस्ट्रेशन करण्याकरीता Live..Registration Link-https://forms.gle/U7DszQ7Z4cz5B3qc8
या लिंकचा वापर करावा . हे शिबिर ,युटुब ,झुम च्या माध्यमातून ऑनलाईन घेण्यात येणार आहे तरी या शिबिराचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन कॉलेज प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे....
0 टिप्पण्या