💥नागरिकांचे आरोग्य धोक्यात ; परिसरातील त्रस्त नागरिकांनी जिल्हाधिकारी मुगळीकर यांच्याकडे केली तक्रार💥
पुर्णा (दि.२५ जुन २०२१) - शहरातील मस्तानपूरा परिसरातील नागरिक नागरी सुविधांच्या अभावामुळे अक्षरशः नर्कयातना सोसत असून परिसरात सर्वत्र अक्षरशः घाणीचे साम्राज्य पसरले असून स्वच्छते अभावी सर्वत्र तुंबलेल्या नाल्या परिसरात साचलेली कचऱ्यांची ढिगार जागोजाग खड्यांमध्ये साचलेले गलिच्छ पाणी यामुळे परिसरातील नागरिक अक्षरशः नर्कयातना सहन करीत असून याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे परिसरातील नागरिकांना नगर परिषद प्रशासना होत असलेला दुषीत पाणीपुरवठा नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणत असून त्यामुळे परिसरात रोगराई पसरण्यासाठी पोषक वातावरण निर्माण तयार झाले आहे यावर उपाययोजना करण्यासाठी नगर परिषद प्रशासन व नगर परिषदेचे मुख्याधिकारी सोनवणे अद्यापही गंभीर नसल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाल्याचे निदर्शनास येत आहे.
पुर्णा नगर पालिकेच्या स्वच्छता विभागाने तात्काळ नाल्यांसह परिसराच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याची आवश्यकता असून नगर परिषद आरोग्य विभागा तर्फे संभाव्य रोगराईचा सामना करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची आवश्यकता असतांनाही नगर परिषद प्रशासन परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्यानंतर ही या परिसरातील गंभीर परिस्थितीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने शेवटी अखेरचा पर्याय म्हणून या परिसरातील युवा नेतृत्व तथा सामाजिक कार्यकर्ते शेख सरान शेख जहीर यांच्या नेतृत्वाखालील शिस्टमंडळाने आज शुक्रवार दि.२५ जुन २०२१ रोजी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार अर्ज देऊन नगर परिषद प्रशासनास परिसरातील स्वच्छतेसह नागरिकांना होणारा दुषीत पाणीपुरवठ्या संदर्भात आदेश देऊन स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी संदर्भात समज द्यावी अशी मागणी केली.
जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की नगर परिषद प्रशासन परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी निवेदन दिल्यानंतर ही परिसरातील स्वच्छतेसह स्वच्छ पिण्याचा पाणीपुरवठा करण्यास अद्याप ही कटीबद्ध नाही त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अगोदरच नागरिक कोरोना महामारीच्या दहशतीखाली वावरत असतांना या परिसरात स्वच्छते अभावी तसेच दुषीत पाणीपुरवठा होत असल्यामुळे परिसरात मलेरिया,गेस्टो,काविळ,डेंग्यू लेप्टोस्पायरोसिस या साथीच्या आजारांसह विषाणूजन्य आजार झपाट्याने पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
💥पूर्णा नगर परिषद प्रशासनाकडे वांरवार तक्रारी देऊन सुध्दा निद्रिस्त न.प.प्रशासन उपाययोजना करण्यास तयार नाही💥
पुर्णा नगर परिषद प्रशासनाने तात्काळ मस्तानपूरा परिसरासह शहरात होणाऱ्या जंतूयुक्त दूषित पाण्याचे नमुने घेउन त्यांची तपासणी सुरू करावी व परिसरातील पसरलेले घाणीचे साम्राज्य करण्याच्या दिशेनं पाऊल उचलावे असे निर्देश जिल्हाधिकारी मुगळीकर साहेबांनी नगर परिषद प्रशासनाला द्यावे अशी विनंती शेख सरान शेख जहीर यांच्या नेतृत्वाखालील शिस्टमंडळाने जिल्हाधिकारी मुगळीकर यांना करताच त्यांनी तात्काळ दखल घेऊन नगर परिषदेचे मुख्याधिकारी सोनवणे यांना आदेश दिले कि लवकरात लवकर कार्यवाही करावी व परिसरातील स्वच्छतेसह नागरिकांना पिण्याच्या स्वच्छ पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलावी....
0 टिप्पण्या