💥या वेळी निवडीचे पत्र पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंतराव पवार यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले💥
परभणी (०१ जुन २०२१) - जिल्हातील गंगाखेड शहरा पासून जवळ असलेले राणीसावरगाव येथील पत्रकार सुरेश नागोराव सालमोटे यांची पत्रकार सुरक्षा समितीच्या गंगाखेड तालूका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या वेळी निवडीचे पत्र पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. यशवंतराव पवार, जिल्हाध्यक्ष प्रसाद पौळ, यांच्या हस्ते देण्यात आले व पूढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
सविस्तर वृत्त असे की संपूर्ण राज्यात पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून पत्रकांरांचे प्रश्न सोडविण्याचे कार्य सूरू असून तर अनेक ठिकानी नविन कार्यकारणीची स्थापना करण्यात येत आहे. आज दिनांक 01/06/21 रोजी ताडकळस येथे महत्वाची बैठक संपन्न झाली या वेळी गंगाखेड तालुका पत्रकार सुरक्षा समितीच्या अध्यक्षपदी सुरेश सालमोटे यांची निवड करण्यात आली. या वेळी निवडीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंतराव पवार व परभणी जिल्हा अध्यक्ष प्रसाद पौळ यांच्या मार्ग दर्शना खाली जिल्हा परभणी जिल्हा अध्यक्ष प्रसाद पौळ पत्रकार सुरक्षा समिती च्या मार्फत करण्यात आली यावेळी पी बी एन न्यूज चे संपादक धम्मपाल हनवते पत्रकार फिरोज पठाण आदींच्या उपस्थितीमध्ये ताडकळस येथे निवड करण्यात आली तालुक्यातील पत्रकारांच्या अडीअडचणी सोडनुक व्हावी हीच अपेक्षा पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून सोडविले आहेत आपल्या हातून तालुक्यातील पत्रकारांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी या माध्यमातून आपली निवड करण्यात आली आहे....
0 टिप्पण्या