🔹मंगरुळपीर आणि कारंजा येथे कायमस्वरूपी कोविड सेंटर उभारावे🔹
🔹दोन्ही ठिकाणी ऑक्सिजन प्लँट सुरू करावे प्रहार पक्षाच्या वतीने मागणी🔹
🔹पालकमंत्री यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना कार्यवाहीची सूचना🔹
मंगरुळपीर (फुलचंद भगत):- प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांना जिल्हा वार्षिक योजना / जिल्हा नियोजन समिती अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांना कार्डिओलॉजीक रुग्णवाहिका पुरवून मंगरुळपीर व कारंजा येथे कायमस्वरूपी कोविड केअर सेंटर व ऑक्सिजन निर्मिती केंद्र उभारून कार्यान्वित करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली असून पालकमंत्री यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन जिल्हाधिकारी यांना याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत
प्रहार जनशक्ती विधिमंडळ पक्ष कार्यालयाच्या वतीने राज्याचे गृह राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांना 16 मे 2021 रोजी पत्राद्वारे करण्यात आली. वाशिम जिल्हा आकांक्षीत जिल्हा असल्याने तसेच, राजकीय दृष्ट्या दुर्लक्षित राहिल्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हा जिल्हा विकासात मागासलेला आहे शासनाचे अनेक मोठे प्रकल्प व योजना या जिल्ह्यात कार्यान्वित होऊ शकलेल्या नाहीत. वाशीम जिल्ह्यात ग्रामीण गावांची संख्या व लोकसंख्या याच्यातील तुलनेत असलेली पायाभूत आरोग्य सुविधा अपुरी आहे. गेल्या १५ वर्षांपासून जिल्ह्यातून लोकसंख्येच्या तुलनेत नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रे निर्मिती करण्याचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात आलेला आहे. तसेच तसेच मंगरूळपीर आणि काही अन्य ग्रामीण रुग्णालयांमधील ५० खाटांच्या १०० घाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्याचे प्रस्ताव सुद्धा शासनस्तरावर पाठविण्यात आलेली आहेत अशा प्रकारचे प्रस्ताव वारंवार पाठवून सुद्धा त्या प्रस्तावांना मंजुरी मिळू शकलेली नाही. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी तसेच लोकसंख्येच्या तुलनेत लोकांना
💥आवश्यक असलेली आरोग्य सुविधा मिळावी यासाठी💥
१) जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांना प्रत्येकी एक याप्रमाणे कार्डिओलॉजीक ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देणे,
२) मंगरूळपीर व कारंजा येथील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक प्रमाणात जागा उपलब्ध असल्याने त्या ठिकाणी कायमस्वरूपी कोविड केअर सेंटर व ऑक्सिजन निर्मिती प्लांट चे बांधकाम करुन कार्यान्वीत करणे बाबत च्या
कामांना आपल्या पुढाकारातून जिल्हा नियोजन समिती किंवा जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मंजुरी दिल्यास जिल्ह्यात चांगल्या प्रकारची आरोग्य सुविधा निर्माण होऊ शकते त्यामुळे याप्रकरणी लक्ष घालून कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली होती. १) जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांना प्रत्येकी एक याप्रमाणे कार्डिओलॉजीक ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देणे,
२) मंगरूळपीर व कारंजा येथील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक प्रमाणात जागा उपलब्ध असल्याने त्या ठिकाणी कायमस्वरूपी कोविड केअर सेंटर व ऑक्सिजन निर्मिती प्लांट चे बांधकाम करुन कार्यान्वीत झाल्यास दोन्ही तालुक्यातील आरोग्य सुविधेचा चांगल्या प्रकारे भर पडून आरोग्य सुविधा नागरिकांना उपलब्ध होणार असल्याने या कामांना मंजुरी देण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली होती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी याबाबत जिल्हाधिकारी, वाशिम यांना उचित कार्यवाही करण्याबाबत सुचविले आहे. याबाबत राज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या कार्यालयाकडून 7 जून रोजी पत्र पाठविण्यात आले आहे.
💥आरोग्य सुविधेसाठी प्रहार कडून पाठपुरावा💥
प्रहार पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांना प्रत्येकी एक याप्रमाणे कार्डिओलॉजीक ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून घेणे व मंगरूळपीर व कारंजा येथील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक प्रमाणात जागा उपलब्ध असल्याने त्या ठिकाणी कायमस्वरूपी कोविड केअर सेंटर व ऑक्सिजन निर्मिती प्लांट चे बांधकाम करुन कार्यान्वीत करून घेण्यासाठी शासन स्तरावर तसेच पालकमंत्री महोदय यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे अशी माहिती प्रहार जनशक्ती विधानमंडळ पक्ष कार्यालयाचे सहसचिव अविनाश पाकधने यांनी दिली आहे.
-------------------------------------------------------
0 टिप्पण्या