💥जिल्ह्यात आज बुधवारी रुग्णालयात उपचारा दरम्यान २ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू 💥
परभणी (दि.०२ जुन २०२१) - परभणी जिल्हात आज बुधवार दि.०२ जुन २०२१ रोजी केवळ ३३ जिल्ह्यात हळुवारपणे कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येसह कोरोनाबाधीतांच्या मृत्यूचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसत आहे जिल्ह्यात आज बुधवारी रुग्णालयात उपचारा दरम्यान २ कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सातत्याने कमी होत असून याचे सर्वस्वी श्रेय आरोग्य प्रशासनातील आरोग्य तज्ञ व आरोग्य कर्मचाऱ्यांसह जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलिस दलाला जाते कारण जिल्ह्यातील आरोग्य विभागातील आरोग्य तज्ञ व कर्मचारी कोरोनाबाधीत रुग्णांचा अत्यंत यशस्वीपणे उपचार करतांना दिसत असल्याने व जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलिस दल लॉकडाऊन संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत असल्याने दिवसेंदिवस कोरोनामुक्तांची संख्या ही वाढतांना दिसत आहे.
जिल्ह्यात आज बुधवार दि.०२ जुन २०२१ रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधोपचार घेऊन पुर्णपणे बरे झालेल्या २२० रुग्णांना रुग्णालय प्रशासनाने सुट्टी दिली असून जिल्ह्यात आजपर्यंत ५००२० कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून यशस्वी उपचारा नंतर आजपर्यंत ४६१८६ कोरोनाबाधीत कोरोनामुक्त झाले आहेत तर जिल्ह्यात आजपर्यंत १२३५ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने एका प्रेसनोट द्वारे कळवले आहे...
0 टिप्पण्या