💥प्रदेशाध्यक्ष पाटील राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रे निमित्त परभणी जिल्ह्याच्या दौर्यावर येणार आहेत💥
परभणी (दि.२२ जुन २०२१) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील हे येत्या मंगळवार दि.२९ जुन २०२१ रोजी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रे निमित्त परभणी जिल्ह्याच्या दौर्यावर येणार आहेत. मंगळवारी दुपारी ०१-४५ वाजेच्या सुमारास त्यांचे जिंतूरला आगमन होणार असून ०२-३० ते ०३-१५ या वेळेत ते जिंतूर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. तेथून ते परभणीत ०४-४५ वाजता आयोजित केलेल्या ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीस हजेरी लावणार असून ०५-३० वाजता जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांबरोबर आढावा बैठक घेणार आहेत. सायं.०६-३० वाजता परभणी विधानसभा मतदार संघाअंतर्गत पदाधिकारी कार्यकर्त्यांबरोबर चर्चा व ०७-१५ वाजता परभणी शहर महानगर जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीस ते उपस्थित राहणार आहेत. परभणीत ते मुक्कामी असून बुधवार दि.३० जुन २०२१ रोजी ते १०-३० वाजता गंगाखेडात दाखल होणार आहेत. त्याही ठिकाणी ११-१५ वाजता विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक,दुपारी १२-४५ वाजता पाथरीत विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक आटोपून ते ०३-१५ वाजता परतूरकडे रवाना होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष किरण सोनटक्के यांनी दिली.....
0 टिप्पण्या