💥ताडकळस पोलिस स्थानकात निवेदन देऊन केली कठोर कारवाईची मागणी💥
पुर्णा (दि.१८ जुन २०२१) - जालना जिल्ह्यातील जाफराबाद मध्ये दैनिक पुढारी वृत्तपत्राच्या पत्रकारावर झालेल्या प्राणघाती हल्ल्याचा ताडकळस येथील मराठी पत्रकार संघाने जाहीर निषेध करत ताडकळस पोलीस स्टेशनला निवेदन दिले.
सविस्तर बातमी अशी, जालना जिल्ह्यातील, जाफराबाद येथील, दैनिक पुढारी चे, तालुका प्रतिनिधी, पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे, यांनी अवैध वाळू वाहतुकीचे, बातम्या प्रसारित केल्यामुळे, काही वाळू माफिया गुंडांनी, एक निर्भीड पत्रकार, ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर, प्राणघातक हल्ला करून, त्यांना गंभीर जखमी केले, व लोकशाहीचा गळा आवडण्याचा काम केला आहे,
राज्यात वाळु माफीयांनी, मोठ्या प्रमाणात, धुमाकूळ माजवला असुन, त्यांच्या या गोरख धंद्यांवर, आळा घालण्यासाठी, आपल्या लेखणीतून, प्रशासनाच्या निदर्शनास, आणून देणाऱ्या, पत्रकारांवर,दिवसेंदिवस वाळु माफियांकडून, जीवघेणे हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहेत. यापुढे अश्या प्रकारच्या घटना, घडू नये, म्हणून प्रशासनाने, घडलेल्या सदर घटनेची, गंभीर दखल घेऊन, संबंधित गुंडांना, तात्काळ अटक करून,कठोर कार्यवाही, करण्याची गरज निर्माण झाली आहे,
देशाच्या चौथ्या आधार स्तंभावर,हल्ला करणे म्हणजे संविधाने दिलेल्या, स्वातंत्र्यावर,गदा आणण्याचा प्रकार आहे, झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ, शुक्रवार दिनांक १८ जुन रोजी, ताडकळस पत्रकार संघाकडून, प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी ताडकळस मराठी पत्रकार संघाचे,अध्यक्ष लक्ष्मीकांत जवळेकर, उपाध्यक्ष फेरोज पठाण , कार्याध्यक्ष मदनराव आंबोरे ,सल्लागार धम्मपाल हनवते, शिवाजीशिराळे ,देवानंद नावकीकर ,बाळासाहेब राऊत,सचिन सोनकांबळे ,शेख शेहजाद , शमिम पठाण ,दिपक कानडे ,गजानन नाईकवाडे ,नजीर पठाण ,हनुमान खुळखुळे, व्यंकटेश पवार यांच्यासह आदी पत्रकार बांधव उपस्थित होते...
0 टिप्पण्या