💥शहर कार्यकारीणीही जाहीर ; शहराध्यक्ष केदार पाथरकर तर चिटणीसपदी लक्ष्मीकांत जवळेकर यांची बिनविरोध निवड💥
मराठी पत्रकार परिषदेच्या तालुका अध्यक्षपदी दौलत भोसले तर शहराध्यक्षपदी केदार पाथरकर यांची निवड करण्यात आली येथील स्वा.सैनिक सूर्यभान पवार महाविद्यालयाच्या सभागृहात जिल्हाध्यक्ष सुरज कदम यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील पत्रकारांची बैठक संपन्न झाली.यावेळी निरीक्षक म्हणून राज्य उपाध्यक्ष प्राचार्य सुरेश नाईकवाडे, लक्ष्मणराव मानोलीकर, शेख ईफ्तेकार उपस्थित होते.प्रमुख मार्गदर्शक म्हणुन प्रकाश कांबळे, डॉ.हरिभाऊ पाटील ,विजय बगाटे,मदन अंभोरे,शेख पाशा फरिद लक्ष्मीकांत शिंदे,सतिश टाकळकर उपस्थित होते.यावेळी सर्वानुमते तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली.त्यात तालुकाध्यक्षपदी दौलत भोसले, कार्याध्यक्ष मुजीब कुरेशी सरचिटणीस गजानन हिवरे, उपाध्यक्ष नवनाथ पारवे व सुरज मगरे , चिटणीस लक्ष्मीकांत जवळेकर(स्वामी), कोषाध्यक्ष शिवाजी बोबडे,सहकोषाध्यक्ष अमृत कऱ्हाळे, समन्वयक माधव आवरगंड, जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिनेश चौधरी व शेख पाशा शेख फरिद , कार्यकारिणी सदस्य प्रताप काळे, शिवबाबा शिंदे, एन.जी.बोखारे,मारोती देसाई, विनायक यादव, कायदेविषयक सल्लागार ॲड. संजय गव्हाणे ,विशेष निमंत्रित विजय बगाटे, जगदीश जोगदंड ,सतीश टाकळकर, लक्ष्मीकांत शिंदे,मोहम्मद अनिस बाबुमीया यांची निवड करण्यात आली.
यावेळी पुर्णा शहर कार्यकारिणी मध्ये शहराध्यक्ष म्हणून केदार पाथरकर, कार्याध्यक्ष मोहन लोखंडे, सरचिटणीस मो.अलीम मो.युसुफ, उपाध्यक्ष, सुशीलकुमार दळवी व सय्यद कलीम, कोषाध्यक्ष संपत तेली , चिटणीस अच्युत जोगदंड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला
दरम्यान जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथील पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्या वर वाळु माफीयांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध करण्यात आला.बैठकीस पुर्णा शहर व तालुक्यातील वझूर ,गौर व ताडकळस येथील पत्रकार मदनराव आंबोरे ,धम्मपाल हानवते ,गजानन आंबोरे ,फेरोज पठाण ,गजानन नाईकवाडे ,शमिम पठाण ,बाळासाहेब राऊत यांच्यासह आदी पत्रकार उपस्थित होते .
प्रास्ताविक हनुमंत हंबिरे यांनी केले .सुत्रसंचलन जगदीश जोगदंड यांनी केले . आभार मानले मोहीते यांनी मानले ....
0 टिप्पण्या