💥वाशिम जिल्ह्यातल्या मंगरूळपीर तालुक्यातील चांदई येथील रहीत शेत शिवारातील घटना💥
[ पिंजर मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर च्या रेस्क्यु टीमची दबंग कामगिरी ]
घटनाक्रम 🏊🏻♀️ चांदई येथील रहिवासी ठाकरे यांच्या शेतातील विहीरीत मोहरी ता.मंगरूळपीर जिल्हा वाशिम येथील तीन मजुर काम करीत होते.एवढयातच दि.१० जुन रोजी दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास शेताला लागुनच असलेल्या नाल्याला आलेल्या पुराचे पाणी विहरीत घुसले आणी विहीर भरली व खसली यामुळे कसेबसे दोन मजुरांनी वर येऊन आपला जिव वाचवला परंतु येथील अणील डोंगरे हा खालीच राहीला तो वर येण्यासाठी प्रयत्न करीत होता परत खाली पडला आणी यामुळे पाण्या खालील मलब्यात दबल्या गेला यावेळी पोलीसांसह स्थानिक नागरिकांनी काल पासुन प्रयत्न केला परंतु विहरीत मलबा पडल्याने विहीर खुपच मोठी व कच्ची असल्याने पुन्हा खचण्याची दाट शक्यता होती यामुळे कोणीच आत जाणे अशक्य होते.यावेळी तहसीलदार कोंडागुरोले यांनी पिंजर येथील मानवसेवा सामाजिक विकास कार्य व आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन चे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन राबविण्यासाठी पाचारण केले. तेव्हा लगेच दीपक सदाफळे यांनी आपले सहकारी मयुर सळेदार, ऋषीकेश तायडे,महेश साबळे,मयुर कळसकार, अतुल उमाळे,गोपाल गी-हे,सुमित मुंढरे, आणी शोध व बचाव साहीत्यासह घटनास्थळी एका तासात पोहचले तेव्हा लगेच सिन ट्रेस केला यावेळी विहीरीत दहा फुट पाणी आणी खाली मोठया प्रमाणावर पडलेला गाळ असल्याने त्यातही वीहीर कच्ची असल्याने खचण्याची दाट शक्यता होती. यावेळी जिवरक्षक दीपक सदाफळे यांनी मोठया शिताफीने व धाडसाने कसोशीने प्रयत्न करुन विहरीत उतरले आणी पाण्याखाली सर्च ऑपरेशन चालु केले गाळ जास्त असल्याने शक्य होत नव्हते तेव्हा दीपक सदाफळे यांनी अंडर वाॅटर सर्चिंग चालु केले तेव्हा त्यांना उभ्या अवस्थेत गाळात फसलेल्या मृतदेहाच्या पायाला टच झाले पुन्हा वर येऊन अंडर प्रेशर ऐअर बॅकप केला आणी पुन्हा तळाशी जाऊन बाॅडी वर आणण्याचा प्रयत्न केला परंतु गाळात फलेली असल्याने वर वढता आली नाही परत वायररोप घेऊन दीपक सदाफळे हे तळाशी गेले आणी पायाला रोप बांधून वर आले आणी आपल्या सहकार्याना वर ओढायला सांगितले तेव्हा अणील डोंगरे चा मृतदेह आज दि.११ जून रोजी दुपारी पाच वाजता पाण्यावर आणला आणी क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढला यावेळी मंगरूळपीरचे ठाणेदार जगदाळे साहेब आणी पोलीस कर्म चारी हजर होते.अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.....
0 टिप्पण्या