💥देशात १६ जानेवारीला लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर प्रथमच एकाच दिवशी इतक्या मोठय़ा प्रमाणावर लसीकरण💥
नवी दिल्ली : करोना लसीकरणाबाबतची सुधारित मार्गदर्शक तत्त्वे लागू केल्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी सायंकाळपर्यंत देशभरात ८२ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली हे एका दिवसातील आजपर्यंतचे विक्रमी लसीकरण आहे देशात १६ जानेवारीला लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर प्रथमच एकाच दिवशी इतक्या मोठय़ा प्रमाणावर लसीकरण करण्यात आले आहे.
देशात आतापर्यंत एकूण २८ कोटी ३३ लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने सांगितले यापूर्वी एकाच दिवशी ४८ लाख नागरिकांच्या लसीकरणाचा विक्रम होता तो आज मागे टाकत दिवसभरात ८२ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरणात आले एका दिवसातील विक्रमी लसीकरणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त करताना लस हे करोनाशी लढण्याचे आपले प्रभावी अस्त्र असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली ज्यांचे लसीकरण झाले त्यांचे अभिनंदन आणि सर्वाच्या लसीकरणासाठी आघाडीवर काम करणाऱ्यांचा हा सन्मान आहे असेही मोदी म्हणाले.
केंद्र सरकारने प्रत्येक भारतीयाचे मोफत लसीकरण करण्यासाठी आजपासून ‘सर्वासाठी मोफत लसीकरण मोहीम’ सुरू केली आहे या मोहिमेचा सर्वाधिक लाभ देशातील गरीब, मध्यमवर्गीय आणि तरुणाईला होईल आपण सर्वानी लसीकरणाची प्रतिज्ञा करू या आपण संघटितपणे करोनाचा पराभव करू असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले सर्वासाठी मोफत लसीकरण मोहिमेनुसार केंद्राकडून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लोकसंख्या, लसीकरणातील प्रगती आदी निकषांनुसार लसामात्रा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जात आहेत या मोहिमेत १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे...
0 टिप्पण्या