💥भारतीय औषध कंपनी झायडस कॅडिलाकडून ही लस तयार करण्यात आली आहे💥
देशात सध्या मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरु असून लवकरच १२ ते १८ वर्षातील मुलांसाठी लस उपलब्ध होणार आहे भारतीय औषध कंपनी झायडस कॅडिलाकडून ही लस तयार करण्यात आली आहे केंद्राने मे.सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे झायडस कॅडिलाच्या लशीची चाचणी पूर्ण झाली असून मान्यता मिळाल्यानंतर लसीकरणास सुरुवात होईल महिन्याच्या सुरूवातीला लसीकरणाच्या धोरणात बदल करण्यात आल्यानंतर लसीकरण मोहिमेबद्दल मे.सुप्रीम कोर्टाने काही प्रश्न उपस्थित केले होते.
त्यांना उत्तर देताना मे.सुप्रीम कोर्टाने वर्षअखेरपर्यंत देशातील १८ वर्षापुढील सर्व नागरिकांचं लसीकरण करण्याची योजना असल्याची माहिती दिली १८ वर्षांपुढील नागरिकांची एकूण लोकसंख्या ९३ ते ९४ कोटी असून त्यासाठी एकूण लसींच्या १८६ कोटी डोसची गरज असल्याचं केंद्र सरकारने सांगितलं आहे सर्व वयोगटासाठी केंद्रावर पोहोचल्यानंतर लस देण्याची सुविधा निर्माण करण्यात आले असून यापुढे ऑनलाइन नोंदणी बंधनकारक नसल्याचंही मे.सुप्रीम कोर्टाने न्यायालयात सांगितलं आहे देशात करोनाच्या ४० कोटी चाचण्या पूर्ण लसीकरण धोरण स्थिर असल्याचं सांगताना केंद्राने नव्या धोरणानुसार १८ वर्षांपुढील सर्वांसाठी लसीचे डोस मोफत असल्याची माहिती दिली आहे.
दुसरीकडे केंद्राने राज्यांना बनावट लसीकरण शिबिरांची चौकशी करुन कडक कारवाई करण्याचा आदेश दिला आहे....
0 टिप्पण्या